Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २४ ऑगस्ट, २०१९
Home
/
Unlabelled
/
पीक विम्याची रक्कम परस्पर कर्ज खात्यात जमा : बँकांची कारवाई : शेतकऱ्यांचे तहसीलदार अनिल गावित यांना निवेदन.
पीक विम्याची रक्कम परस्पर कर्ज खात्यात जमा : बँकांची कारवाई : शेतकऱ्यांचे तहसीलदार अनिल गावित यांना निवेदन.
चोपडा(प्रतिनिधी) दीलीप पाटील
शेतकऱ्यांना २०१८/१९ या आर्थिक वर्षात हवामानावर आधारित पीक विम्याची रक्कम मंजूर झाली असून,सदर रक्कम संबधित बँकेत
जमा झाली आहे.यंदा दुष्काळ जाहीर झाला असतांना देखील बँकांनी विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात परस्पर वळती केली आहे.बँकांच्या या कारवाईमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून दुष्काळात तेरावा महिना म्हणावा लागेल म्हणून मंजूर झालेली विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बचत खात्यात तात्काळ जमा करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदार अनिल गावित यांचे कडे निवेदनाद्वारे केली आहे.
चोपडा तालुक्यातील मोहिदा, अजंटीसिम, वढोदा, विटनेर, दगडी येथील शेतकऱ्यांनी २०१८-१९ वर्षात हवामानावर आधारित केळी पीकविमा काढला होता.याच वर्षी तापमानात झालेली वाढ व कडाक्याची थंडी मुळे केळी पिकाचे नुकसान झाल्याने शासनाने पीक विम्याची रक्कम मंजूर केली असून ,सदर रक्कम संबधित बँकेत जमा झाली आहे.विशेष म्हणजे गेल्या वर्षी शासनाने जळगाव जिल्ह्यात दुष्काळ जाहीर केला असतांना देखील स्टेट बँक ऑफ इंडिया, देना बँक व सेंट्रल बँक या
तिन्ही बँकांनी शेतकऱ्यांची परवानगी न घेता परस्पर त्यांच्या कर्ज खात्यात विम्याची रक्कम जमा केली आहे बँकांच्या या कारवाईमुळे केळी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.
याबाबत केळी उत्पादक शेतकरी तथा पंचायत समितीचे उपसभापती एम.व्ही.पाटील, डॉ. हनुमंत पाटील ,हिरालाल पाटील ,तुकाराम पाटील,समाधान संतोष पाटील,मंगल बुंधा पाटील,चंद्रकांत बाविस्कर आदी शेतकऱ्यांनी
तहसीलदार अनिल गावित यांना निवेदन दिले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक ब्युरो चीफ कसबे वणी, ता. दिंडोरी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी अटकेत वणी पोलीस ठाणेस गुरनं ४३/२०२६ भा.न्या.सं. कलम ६४...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा