Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २४ ऑगस्ट, २०१९
Home
/
Unlabelled
/
नगरपालिकेच्या घरपट्टी भाडेवाढीच्या विरोधात चोपड्यात नागरिकांचा मोर्चा : मोर्चेकऱ्यांचा दोन तास ठिय्या
नगरपालिकेच्या घरपट्टी भाडेवाढीच्या विरोधात चोपड्यात नागरिकांचा मोर्चा : मोर्चेकऱ्यांचा दोन तास ठिय्या
चोपडा(प्रतिनिधी) दीलीप पाटील
येथील नगरपालिकेने नागरिकांना नागरी सुविधा न पुरविता अवाजवी २५ टक्के घरपट्टी वाढीचा निर्णय घेतला आहे. नगरपालिकेच्या निर्णयाला विरोध दर्शविण्यासाठी आज २३ रोजी दुपारी ११ वाजता माजी पंचायत समिती सदस्य डॉ.चंद्रकांत बारेला यांचा नेतृत्वाखाली नगरपालिकेवर नागरिकांचा मोर्चा काढण्यात आला.यावेळी नगराध्यक्षा मनीषा चौधरी व
मुख्याधिकारी डॉ.अविनाश गांगोडे यांनी मोर्चेकऱ्यांचे निवेदन स्विकारले.परंतु प्रशासना
कडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने मोर्चेकऱ्यांनी प्रशासकीय इमारतीच्या पायऱ्यांवर दोन बसून ठिय्या आंदोलन केले.
येथील नगरपालिकेच्या घरपट्टी भाडेवाढीच्या
निर्णया विरोधात डॉ.चंद्रकांत बारेला,प्रा.शरद पाटील यांच्या नेतृत्वाखाली दि.२३ रोजी सकाळी ११ वाजता मोर्च्याला ग्रामीण पोलिस स्टेशन जवळील पोलिस मैदाना पासून प्रारंभ झाला.शहरातील थाळनेर दरवाजा,चिंच चौक, गुजराथी गल्ली,गोलमंदीर मार्गे मेनरोडवरून शनिमंदिर,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी चौकातून थेट नगरपालिका कार्यालयावर दुपारी १२ वाजता मोर्चा पोहचला मोर्च्यात नगरपालिका प्रशासना विरोधात जोरदार घोषणा बाजी करण्यात येऊन भाडेवाढीचा निषेध करण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा मनीषा चौधरी,गटनेते जीवन चौधरी मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांनी निवेदन देण्यात आले.शासनाच्या नियमानुसार घरपट्टी ची आकारणी केली जाते.तसेच दर चार वर्षांनी रिव्हिजन करून कर सुधारणा करणे क्रमप्राप्त आहे. घरपट्टीत झालेली भाडेवाढ नियमानुसार असून, याबाबत वरिष्ठांकडे अपील दाखल करून न्याय मागू शकतात असे मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांनी मोर्चेकऱ्यांना सांगितले. परंतु मुख्याधिकाऱ्यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने मोर्चेक-यांनी प्रशासकीय ईमारतीच्या प्रवेश द्वाराच्या पायऱ्यांवर दोन तास ठिय्या आंदोलन केले. मोर्चेकरी समाधानकारक उत्तराची अपेक्षा करीत होते. परंतू साडेतीन वाजेपर्यंत प्रशासनाने समाधान कारक उत्तर न दिल्याने अखेर मोर्चेकऱ्यांनी अवाजवी २५टक्के घरपट्टी भाडेवाढी विरुद्ध वरिष्ठांकडे कायदेशीर पाठपुरावा करणार असल्याचे डॉ.चद्रकांत बारेला यांनी सांगितले त्यानंतर ठिय्या आंदोलनांची सांगता करण्यात आली.मोर्च्याला
डॉ.चंद्रकांत बारेला व प्रा.शरद पाटील यांनी
संबोधित केले.
मोर्च्यात डॉ.चद्रकांत बारेला,प्रा.शरद पाटील, गजानन पोतदार,अर्जुन चौधरी,अमोल राजपूत, ईश्वर सुर्यवंशी,जियाउद्दीन काझी,सचिन पाटील दीपक वानखेडे यांचासह शेकडो नागरीक सहभागी झाले होते.यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार,पो.ना.विलेश सोनवणे व पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक ब्युरो चीफ कसबे वणी, ता. दिंडोरी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी अटकेत वणी पोलीस ठाणेस गुरनं ४३/२०२६ भा.न्या.सं. कलम ६४...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा