Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०१९

पन्नास टक्के खर्च करा जळगावला आणखी १०० कोटी देतो – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस



जळगाव प्रतिनिधी  आमदार राजुमामा भोळे म्हटले जळगाव करीता मोठा निधी दिला, आणखी काही देता येईल काय – असे मला म्हणाले, मी राजुमामा ना सांगितले दिलेल्या १०० कोटी मधून पन्नास टक्के खर्च केल्याची प्रत आणा जळगावच्या रस्त्याच्या कामा करिता आणखी १०० कोटी देतो, शहरात कामे सुरू असून तो पूर्ण खर्च करा व आणखी विकासा करीता निधी देणार असल्याची कबुली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेत दिली आहे.

दुसऱ्या टप्प्यातील महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने सागर पार्क येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनतेला संबोधित करीत आहे, विधान सभेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री संपूर्ण महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून जिल्ह्यातील अमळनेर, पारोळा,धरणगाव येथे भेट दिल्यानंतर जळगाव येथे जाहीर सभा करीत आहे, यादरम्यान ठिकठिकाणी भेटी देत आहे.

यावेळी , पर्यटन मंत्री जयकुमार रावल, जलसंपदामंत्री गिरीश महाजन,आमदार एकनाथ राव खडसे,आमदार सुरजित सिह ठाकूर,खासदार रक्षा खडसे,ना. हरिभाऊ जावळे,खासदार उन्मेष पाटील,संघटन मंत्री किशोर काळकर, जिल्हा परिषद अध्यक्ष उज्वला पाटील,जिल्हापरिषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, राजेंद्र फडके,आमदार स्मिता वाघ,आमदार राजुमामा भोळे,आमदार चंदूलाल पटेल,ग्रामीण अध्यक्ष संजीव पाटील महापौर सीमा भोळे, उपमहापौर अश्विन सोनवणे,मनपा सभागृह नेते ललित कोल्हे, स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे,नगरसेवक कैलास सोनवणे,विशाल त्रिपाठी ,दीपक साखरे यांच्या सह पदाधिकारी उपस्थित आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध