Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०१९
Home
/
Unlabelled
/
राज्य सहकारी बँक घोटाळा : अजित पवार, आनंदराव अडसूळ यांच्यासह 51 जणांविरूध्द FIR दाखल करण्याचा कोर्टाचा आदेश
राज्य सहकारी बँक घोटाळा : अजित पवार, आनंदराव अडसूळ यांच्यासह 51 जणांविरूध्द FIR दाखल करण्याचा कोर्टाचा आदेश
मुंबई :प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी हायकोर्टाने अजित पवारांसह अनेक नेत्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे अजित पवारांच्या अडचणीत वाढ झाली असून येत्या पाच दिवसांत हि प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश कोर्टाने पोलिसांना दिले आहेत.
या घोटाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह अनेक नेत्यांचा सहभाग असून यामध्ये मधुकर चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आनंदराव अडसूळ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांचा देखील समावेश आहे. यामध्ये पवार यांच्यासह ५० जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या १५ वर्षाच्या सत्ताकाळात मोठ्या प्रमाणात या बँकेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर २०११ मध्ये रिझर्व्ह बँकेने या बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे आता या सर्वांवर गुन्हे दाखल होऊन त्यांच्यावर काय कारवाई केली जाते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, याआधी देखील अजित पवार यांच्या सिंचन घोटाळ्याप्रकरणी आरोप करण्यात आले असून त्या प्रकरणात देखील त्यांच्यावर अटकेची तलवार असून या प्रकरणात हायकोर्टाच्या या आदेशाने त्यांच्या अडचणींत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...
