Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १५ ऑगस्ट, २०१९

वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदे भरल्यामुळे ग्रामीण भागातील जनतेस मिळणार उत्तम आरोग्य सेवा




उस्मानाबाद प्रतिनिधी विशाल डुकरे 
उस्मानाबाद जिल्हयातील ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी एमबीबीएस अर्हताधारक डॉक्टर मिळत नसल्यामुळे मागील वर्षानुवर्ष रिक्त असलेल्या वैद्यकीय अधिकारी पदावर बी.ए.एम.एस अर्हताधारकांना संधी 

दिल्यामुळे जिल्ह्यातील 20 च्या 20 जागा जिल्हा निवड समिती मार्फत मुलाखतील व्दारे भरण्यात आल्या आहेत. यामुळे ग्रामीण भागात असणारा डॉक्टरांचा तुटवडा भरुन निघाला आहे. यामुळे जनतेला मोठा फायदा होणार आहे. 

उस्मानाबाद जिल्हा हा केंद्र शासनाने निती आयोगांतर्गत आकांक्षित जिल्हा म्हणून घोषीत केला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील नागरिकांना सुदृढ व उत्तम दर्जाची आरोग्य सेवा देण्याकरिता सर्व उपजिल्हा/ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रिक्त असणाऱ्या डॉक्टरांची रिक्त पदे 

भरण्यासाठी जुलै 2019 पासून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या गुरुवारी एमबीबीएस अर्हताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आल्या.यामध्ये एमबीबीएस अर्हताधारक पुरेसे प्रमाणात उपलब्ध होत नसल्यामुळे 4 जुलै 2019 च्या शासन निर्णयानुसार 30 जुलै 2019 रोजी बीएएमएस अर्हताधारक पदभरतीकरिता जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. 

त्यानुसार दि. 14 ऑगस्ट 2019 रोजी जिल्हाधिकारी श्रीमती दीपा मुधोळ-मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली थेट पदभरती करुन एकूण 21 रिक्त पदे भरण्यात आली यापैकी 1 पद ग्रामीण रुग्णालय वाशी व उर्वरित 20 पदे  प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी भरण्यात आली आहेत. यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळणार आहे. 

जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्यासाठी जिल्हाधिकारी श्रीमती दीपा मुधोळ-मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद डॉ.संजय कोलते, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राज गलांडे-

पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हनुमंत वडगावे, समाज कल्याण अधिकारी व आदिवासी विकास विभागाचे प्रतिनिधींनी पारदर्शी प्रक्रिया राबविली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध