Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १५ ऑगस्ट, २०१९
*अमळनेर येथे धनदाई महाविदयालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा...*
*स्वातंत्र्यदिनाचे औचित्यसाधून पंचवीस जेष्ठ नागरिकांचा केला सन्मान..*
अमळनेर:प्रतिनिधी (शिवाजी पारधी) अमळनेर
येथील धनदाई माता एज्यूकेशन ,सोसायटी प्र.डांगरी संचलित धनदाई कला व विज्ञान महाविदयालय व जय योगेश्वर माध्य .व उच्च माध्यमिक व शांतीनिकेतन प्राथमिक शाळेचा एकत्रित ७३वा स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न झाला .
यावेळी गतवर्षी एस.एस.सी परिक्षेत शाळेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली विदयार्थींनीच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली कु.कोमल संजय भामरे हिचा सत्कार डाँ.श्रीकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
जय योगेश्वर माध्यमिक व शांतीनिकेतन शाळेच्या विदयार्थींनी झेंडागीत व देशभक्तीपर गीते सादर केली.
तसेच संस्थेचे शालेय समिती संचालक तथा शाळेत कार्यरत असलेले शिक्षक शैलेंद्र पाटील यांनी "जहाँ डाल डाल पर "हे
देशभक्तीपर गीत सुमधुर आवाजात गायिले.
या प्रसंगी मंचावर उपस्थित२५ मान्यवर जेष्ठ नागरिकांचा एक वृक्ष व शाँल,श्रीफळ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला .
भारतीय सैन्यदलातील काश्मीर खो-यात सेवा दिलेले सैनिक जितेंद्र पंढरीनाथ सोनवणे
यांचा देखील सन्मान याप्रसंगी करण्यात आला.
यावेळी वृक्षमित्र पंकज पाटील यांनी दहिवद गावात सुमारे ४०००वृक्ष जगविल्याची प्रेरणादायी हकिकत विदयार्थांसमोर मांडली संवर्धनाविषयी माहिती दिली.या कामगिरीबद्दल त्यांचा स्वागत व सत्कार एक वृक्ष व शाल,श्रीफळ देऊन केला.
यावेळी धनदाई एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब डी.डी.पाटील म्हणाले की,वृक्ष लागवड ही काळाची गरज आहे. जेथे जास्त झाडे तेथे जास्त पाऊस पडतो. म्हणूनजास्त प्रमाणात वृक्ष लागवड झाली पाहिजे तसेच तंबाखूमुक्त महाराष्ट्र व्हायला पाहिजे .
शेवटी अध्यक्षीय भाषणात धनदाई कला महाविदयालयाचे चेअरमन आबासाहेब व.ता.पाटील यांनी स्वातंत्र्यदिन व रक्षाबंधन एकत्र येणे हा एक अपूर्व योग असल्याचे सांगून स्वातंत्र्यांचे रूपांतर सुराज्यात व्हावे म्हणून "पाणी अडवा पाणी जिरवा झाडे लावा व बेटी वाचवा " या तत्वाचे आचरण करावे असे आवाहन केले.
या कार्यक्रमात पांडुरंग पाटील ,मधुकर गंगाराम पाटील ,बाजीराव चिंधा पाटील ,सखाराम दामू पाटील ,विठ्ठल चिंधू बोरसे श्रावण उत्तम पाटील ,दामोदर महारू पाटील ,रतिलाल भावसार,रणधिर उत्तमराव पाटील ,नथ्थू किसन पवार,मनोहर शिवदास शिसोदे,सुरेश शामराव चौधरी,शरद साहेबराव शिसोदे,गुलाबराव दगाजी पवार,पंकज पाटील ,एस.एस.पाटील ,बी.एम.पाटील,व्ही.जे पाटील ,जगन्नाथ ठाकरे,विठ्ठल देवराम पाटील,मधुकर बारड,गुलाबराव शिसोदे आदि मान्यवर उपस्थित होते. तसेच धनदाई माता
एज्यूकेशन सोसायटीच्या शांतीनिकेतन प्राथमिक विदयामंदीर ,जय योगेश्वर माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय ,कला व विज्ञान महाविदयालय ,चित्रकला महाविदयालय I.T.I काँलेज आदिंच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांचा सहभाग होता.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा