Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १४ ऑगस्ट, २०१९
Home
/
Unlabelled
/
तोरखेडा (ता.शहादा) येथील सु.भ.क माध्यमिक विद्यालय व पुष्पाबेन रमनलाल गुजराथी या शाळेत विद्यार्थीनां मोफत शालेय गणवेश वाटपाचा कार्यक्रम सपन्न
तोरखेडा (ता.शहादा) येथील सु.भ.क माध्यमिक विद्यालय व पुष्पाबेन रमनलाल गुजराथी या शाळेत विद्यार्थीनां मोफत शालेय गणवेश वाटपाचा कार्यक्रम सपन्न
तोरखेडा दि.11 प्रतिनिधी (बाबू मण्यार )
तोरखेडा (ता.शहादा) येथील सु.भ.क माध्यमिक विद्यालय व पुष्पाबेन रमनलाल गुजराथी या शाळेत विद्यार्थीनां मोफत शालेय गणवेश वाटपाचा कार्यक्रम सपन्न झाला.यात जे विद्यार्थी शाळेत येवू शकतात पण ते गणवेश घेवू शकत नाही.अशा विद्यार्थांना गणवेश वाटप करण्यात
आले.त्यात एकूण 70 विद्यार्थ्यांचा समावेश होता.त्यात 34 मुले आणि 36 मुलींना गणवेश वाटप करण्यात आले.तसेच गणवेशसाठी लागनारा खर्च गावतल्या ग्रामस्तानकडून व शाळेतल्या कर्मचारी यांचा मदतीने करण्यात आला.ह्या मदतीसाठी शाळेतील प्राचार्य पी.टी.पाटिल यांनी चांगलीच मेहनत घेतली.या कार्यक्रमाचा सुरूवातील मान्यवरांचे तसेच,पत्रकार,ग्रामस्थांचे श्रीफळ व गुलाब पुष्प देवून स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष ईस्माईल भाई लोहिया यांंना देण्यात आले. सरस्वती मातेचे प्रतिमा पूजन श्रीफळ फोडुन कार्यक्रमला सुरवात करण्यात आली.गणवेश वाटपाचे अध्यक्ष स्थान जि.प.सदस्या सिमाजी तुषार रंधे यांना देवून गणवेश वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाप्रसंगी प्राचार्य पी.टी.पाटिल,पर्यवेक्षक श्री.जी.आर. बडगुजर,श्रीराम चौधरी, यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी कार्यक्रमाला उपस्थितीत जि.प.सदस्या सिमाजी तुषार रंधे,शालेय शिक्षण समिती अध्यक्ष ईस्माईल भाई,सदस्य सतिष वाणी,पं.स.प्रियदर्शनजी कदमबांडे, पर्यवेक्षक
श्री.जी.आर.बडगुजर,जितेंन्द्र सोनार,संजय चौधरी,राकेश पाटिल, युवराज वाडिले,दिपक चौधरी,मनिष गरुड,भिका चव्हान,रतिलाल वाडिले, श्रिराम चौधरी,आदि उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ए.जी.मोरे, ए.डी.ठाकरे, बी.बी.पाटील,एस.ए.कुवर, श्रीमती चौधरी,श्रीमती बडगुजर परिश्रम
घेतले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केसेकर सर यांनी केले.तर उपस्थित मान्यवरांचे आभार एस.ए.पाटील सर यांनी मानले
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा