Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १५ ऑगस्ट, २०१९
तीन महिण्यात निंभोरा ते विवराफाटा रस्त्याचे तीन तेरा. निंभोरा बुद्रुक .रावेर
रावेर प्रतिनिधी (अजीज शेख) तालुक्यातील येथिल निंभोरा ते
विवराफाटा हा रस्ता तीन महिण्यांपूर्वी तीन टप्यात पूर्ण करण्यात आला होता. कामाची निकृष्टता एवढि आहे की शेवटच्या टप्यात केलेले काम जागो जागी उखडून खड्डे पडू लागले आहे. काही ठीकाणी साईट पट्टया पूर्ण नसून रस्ता अरूंद असल्याने समोरून फोरव्हीलर आल्यास मोटारसायकल स्वारलाही कसरत करूण निघावे लागते खुपच अरूंद असा हा रस्ता आहे.
केवळ तीन महिन्यांपूर्वी काम पूर्ण झालेल्या निंभोरा ते विवराफाटा हा रस्ता ठीकठिकाणी उखडला असून ठेकेदाराने केलेले निकृष्ट काम यामुळे समोर आले आहे. निंभोरा ते विवराफाटा हा सुमारे चार किलोमीटर अंतराचा रस्ता नादुरुस्त झाला होता. रस्त्याच्या या दुरवस्थेमुळे निंभोरा ग्रामस्थांनी सुनिल कोंडे यांच्या नेतृत्वाखाली मागील वर्षी उपोषण केले होते तात्काळ आमदार हरिभाऊ जावळे आणि जिल्हा
परिषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांनी निधी उपल्ब्ध करूण दोघांच्या प्रयत्नाने रस्त्याचे काम तीन टप्प्यात झाले. मात्र अवघ्या तीन महिन्यातच रस्त्याची वाट लागली आहे. रस्त्यावर ठिकाणी खड्डे पडले असून त्यात पावसाचे पाणी साचले आहे. ठेकेदाराने अत्यंत निकृष्ट काम केल्याचे दिसून येत आहे. हा रस्ता प्रदीर्घ
काळापासून दुर्दशा झालेला होता. तो नुकताच दुरुस्त झाल्यानंतर पुन्हा तीन महिन्यातच त्यावर पुन्हा खड्डे पडल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. दरम्यान लोकप्रतिनिधी व प्रशासनाने या प्रकाराकळे लक्ष देवून संबंधित कंत्राटदाराने तातडीने हा रस्ता पुन्हा दुरुस्त करून द्यावा अशी मागणी शेतकरी वर्ग, सुज्ञनागरीक व निंभोरासह परीसरातील वाहनधारक करीत आहे.
फोटोत:- निंभोरा ते विवराफाटा दरम्यान रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये जमा झालेले पावसाचे पाणी.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा