Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १५ ऑगस्ट, २०१९
वेळोदे शेत शिवारात आढळला बिबट्याचा खूनच एकाने दिली कबुली!!
प्रतिनिधी चोपडा विनोद निकम
तालुक्यातील वेळोदे शिवारातील विपीन वल्लभदास गुजराथी यांचा मालकीचे शेत साहेबराव केशव बागुल हे करीत असलेल्या शेतात मृत अवस्थेत बिबट्या आढळल्याची घटना १२ रोजी घडली होती.
त्यावेळी बिबट्या हा काहीतरी विषारी पदार्थ खाऊन मयत झाल्याची माहिती वनविभागाने दिली होती,त्या घटनेत आज दुसरा खुलासा झाल्याची माहिती वनविभागाचे सहा.वनसंरक्षक व्ही. एच. पवार यांनी दिली आहे.
व्ही एच पवार यांनी सांगितले की,वेळोदे येथील रहिवासी असलेले सुनिल धरमसिंग पावरा(२८)यानेच आपली वासरी मयत झाली आणि तिला वन्यजीव प्राण्यांनेच मारले म्हणून मेलेल्या वासरीच्या अंगावर थायमेट हे विषारी पदार्थ टाकले होते ते खाऊन हा बिबट्या मयत झाला अशी कबुली स्वतः सुनील पावरा याने
वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली आहे.
या प्रकरणी संशयित आरोपी म्हणून वनविभागाने त्याला ताब्यात घेतले असून दि १५ रोजी चोपडा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
त्यामुळे बिबट्याचा खूनच झाला आहे हे यावरून सिद्ध होते.यात सहायक वनसंरक्षक व्ही.एच.पवार, वनक्षेत्रपाल पी.बी.पाटील,पुढील तपास करीत आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा