Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ८ ऑगस्ट, २०१९

देश अभ्यासू नेतृत्वाला मुकला सुषमाजी स्वराज यांना भाजपा धुळे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांची भावपूर्ण श्रद्धांजली




शिरपुर (प्रतिनिधी) भाजपच्या ज्येष्ठ नेत्या तथा माजी विदेश मंत्री सुषमाजी स्वराज यांच्या निधनाने देश एका कणखर, सुसंस्कृत व अभ्यासू नेतृत्वाला मुकला असून पक्षाची मोठी हानी झाली आहे अशा शब्दांत भाजपा धुळे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. 

शिरपुर येथील भाजपा कार्यालयात दि.8/8/2019 रोजी श्रीमती सुषमाजी स्वराज यांची प्रतिमा पुजन करुन आदरांजली वाहण्यात आली त्यावेळी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी बोलत होते. ते पुढे म्हणाले कि संसदेत त्यांचा आवाज बुलंद होता. एक कणखर, सुसंस्कृत, 

अभ्यासू व शालीन असे त्यांचे नेतृत्व होते. अश्या आपल्या तेजस्वी नेत्या आपल्याला पोरक करुन गेल्या, त्यांच्या निधनाने दुःख आणि वेदना व्यक्त करायला माझ्याकडे शब्द नाहीत अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात. यावेळी शिवसेना ज्येष्ठ नेते राजु टेलर, भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, जिल्हा उपाध्यक्ष किशोर माळी, जिल्हा चिटणीस संजय आसापुरे, चंद्रकांत पाटील, जिल्हा 

कोषाध्यक्ष आबा धाकड, तालुका प्रभारी डाॅ.जितेंद्र ठाकुर, शहराध्यक्ष हेमंत पाटील, वैद्यकिय आघाडी जिल्हाध्यक्ष डाॅ.मनोज निकम, भाजपा शहर सरचिटणीस महेंद्र पाटील, उपाध्यक्ष प्रशांत चौधरी, चिटणीस राधेश्याम भोई, अविनाश शिंपी, भटक्या विमुक्त आघाडी जिल्हा उपाध्यक्ष बापु लोहार, शहराध्यक्ष रविंद्र भोई, 

अल्पसंख्याक मोर्चा जिल्हा सरचिटणीस मुबीन शेख, शेतकरी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष भास्कर बोरसे, ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष रविंद्र सोनार, व्यापारी आघाडी शहराध्यक्ष नंदु माळी, भालचंद्र चौधरी, हिरालाल कोळी, प्रविण पाटील, मेहुल धाकड, जयवंत पाटील, पंकज बनभेरु आदि पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध