Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, ११ ऑगस्ट, २०१९

अहमदपूरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून पूरग्रस्तासाठी मदतीचा हात




अहमदपूर गजानन आनंतवाळ ( प्रतिनिधी ) अहमदपूर शहरात आज दि. १०ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सांगली, सातारा, कोल्हापूर या भागातील पुरग्रस्तांना मदत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष मा.आ.बाबासाहेब पाटील यांच्या पुढाकारातून अहमदपूर शहरात पदयात्रेव्दारे निधी संकलन करण्यात आले सदरील जमा झालेला निधी व माजी आमदार बाबासाहेब पाटील यांचे एक महिण्याचे वेतन एकुण रक्कम 

पुरग्रस्तासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश पक्ष कार्यालयाकडे पाठविण्यात येणार असल्याचे माजी आमदार बाबासाहेब पाटील यांनी सांगितले. पूरग्रस्तांसाठीच्या निधी संकलन पद यात्रेत माजी आमदार बाबासाहेब पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँगेस तालुकाध्यक्ष शिवानंद हेंगणे, विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील टाकळगावकर, जि.प. गटनेते मंचकराव पाटील, माजी सभापती अॅड.टि.एन.कांबळे,राष्ट्रवादीचे 

जिल्हासरचिटणीस गोविंदराव गिरी, शहराध्यक्ष अजहर बागवान, जि.प. सदस्य माधव जाधव, महेश बँकेचे उपाध्यक्ष निवृत्ती कांबळे, राष्ट्रवादी ग्रंथालय विभागाचे जिल्हाध्यक्ष नबीभाई सय्यद, शिवाजीराव देशमुख, महिला तालुकाध्यक्षा मिनाक्षी शिंगडे, शहराध्यक्ष शाहुबाई कांबळे, उपाध्यक्ष फिरोज शेख, युवक जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत भोसले, युवक 

तालुकाध्यक्ष नामदेव सुरनर, शहराध्यक्ष एजाज शेख,  बाबुभाई रुईकर, शैलेश जाधव, तानाजी राजे,मुकेश पाटील, नगरसेवक अभय मिरकले, सय्यद सरवर लाल, अॅड. सय्यद अलिम, डॉ. फुजैल जहागीरदार, सुनिल डावरे, सय्यद मुन्ना, सादीक चाऊस, दस्तगीर शेख, प्रविण उपासे, बाळासाहेब बेडदे, गंगाधर ताडमे, विद्यार्थी तालुकाध्यक्ष साईनाथ पाटील, विठ्ठल मुळे, संग्राम पवार,  चंद्रशेखर भालेराव, इलाही बागवान, महंमद नाजीम, शिवाजी क्षिरसागर, दयानंद पाटील, 

जगदीश वाघमारे, व्यंकट वंगे, शाम देवकते, भगवान ससाणे, भगवान दुर्गे, महेश मोरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते या पुरग्रस्त मदत फेरीमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध