Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ११ ऑगस्ट, २०१९
अनाथाचा वाली शंकर सदाशिवराव गुट्टे
अहमदपूर प्रतिनिधी (गजानन आनंतवाळ). 73 अनाथ विद्यार्थ्यांना गणवेश वाटप शैक्षणिक आधार आणि 14 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
लक्ष्मणराव गुटटे रूरल डेव्हलपमेंट फाऊंडेशनच्या वतीने आज श्री महेश विद्यालय शिरूर ताजबंद येथे 73 अनाथ मुलांना शैक्षणिक आधार आणि 14 गुणवंताचा सत्कार कार्यक्रम श्रीमती अरुणा संगेवार मॅडम (तहसीलदार अहमदपूर ) यांच्या शुभहस्ते संपन्न झाला ...
नवोदय विद्यालय सातारा सैनिक स्कूल राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा ई विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये परीक्षेमध्ये गुणवंत असलेल्या अनेक विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला....
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री एम एम पेदेवाड सर उपस्थित होते....
या कार्यक्रमास संस्थेचे सचिव श्री चंद्रशेखर पाटील साहेब तसेच कोषाध्यक्ष भगवांसिंह बायस गुरुजी तसेच फाऊंडेशनचे श्री अक्षय ठाकूर, नितीन गुट्टे गजानन अनंतवाळ ई.उपस्थित होते....
तहसीलदार श्रीमती संगेवार म्हणाल्या लक्ष्मणराव गुट्टे रुरल फाऊंडेशनच्या माध्यमातून ग्रामीण भागातील खऱ्या अर्थाने अनाथ मुलांना आधार देण्याचे काम आणि कर्तव्य गेली अनेक वर्षापासून
प्रामाणिकपणे पार पडत आहे याबद्दल खूप मनस्वी आनंद होतो समाजात अशा दातृत्वा असणाऱ्या संस्था टिकल्या पाहिजेत उभ्या राहिल्या पाहिजेत यासाठी सर्वांनी सामाजिक भावनेतून कार्य केले पाहिजे आज या गुणवंताचा सत्कार करताना भविष्यात त्यांच्या उज्ज्वल यशासाठी शुभेच्छा द्यायला आज खूप मनापासून आनंद होतो ... बालपणी आपल्याला अशा प्रकारचा सत्कार मिळाल्यास मनापासून खूप आनंद व्हायचा.. मीही स्वतः शिक्षकी पेशातून काम करत परीक्षा देत पुढे
अधिकारी झाली तसेच या सर्व विद्यार्थ्यांना मी आव्हान करते कष्ट करायला कमी पडू नका नशीब आपोआप बदलत राहते प्रामाणिकपणा आणि जिद्द या गोष्टी कायम स्वतःजवळ ठेवा आणि अभ्यास करत राहा यश तुम्हाला नक्की मिळेल याची मला खात्री आहे पुन्हा एकदा आपल्याला सर्वांना शुभेच्छा देते
या कार्यक्रमास प्राचार्य श्री केसाळे साहेब तसेच श्री धर्मराज पुणे श्री हमपाले सर पर्यवेक्षक श्री बिराजदार सर श्री धनूरे सर इत्यादी सर्व शिक्षक मंडळी सहकार्य केले....
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा