Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ३० ऑगस्ट, २०१९
कुरखळी जि प शाळेत विद्यार्थ्यांनी बनविल्या पर्यावरण पुरक बैल व गणेश मूर्त्या
कुरखळी प्रतिनिधी - योगेश्वर मोरे
शिरपूर तालुक्यातील कुरखळी जिल्हा परिषद मराठी शाळेत पोळा व गणेशोत्सवाचे औचित्य साधून पर्यावरण पूरक बैल व गणेश मूर्ती तयार करण्याचा अभिनव उपक्रम शाळेतर्फे आयोजित करण्यात आला. याउपक्रमात ५५ ते ७० विद्यार्थ्यांचा धभाग होता.
पर्यावरणाचा समतोल राखणे व त्यासाठी योग्य त्या उपाययोजणांचे योग्य मार्गदर्शन व प्रत्यक्ष अध्ययन हे बाळ वयातच विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्याचे व समाजात याचा योग्य संदेशाद्वारे जनजागृती करण्याकरिता हा आगळा वेगळा अभिनव उपक्रम कुरखळी येथील जि प मराठी शाळेने दि 29 ऑगस्ट रोजी राबविला.
जगासोबत ज्ञानार्जीत होऊन जगात आपली वेगळी ओळख असणे, रोजच्या दळणवळण व व्यवहाराच्या घटकांचा अभ्यास करणे, यान इतर घटकांचा अभ्यासपूर्ण मार्गदर्शन व प्रात्यक्षिकातून ज्ञानार्जनाची मोहीम वेळोवेळी राबवित असतो असे प्रतिपादन शाळेचे शिक्षक ज्ञानेश्वर माळी यांनी केले.
विद्यार्थ्यांमध्ये पारंपरिक व भारतीय संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी तसेच पर्यावरणाचा ऱ्हास होण्यापासून सावध करून समतोल राखण्याच्या दृष्टीने राबविलेल्या या अभिनव उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक केले जात आहे.
या उपक्रमासाठी मुख्याध्यापक श्री रघुनाथ गित्ते, शिक्षक श्री ज्ञानेश्वर माळी, शिक्षिका सौ योगिता नेरकर यांचे मार्गदर्शन लाभले.
तर अंगणवाडी शिक्षका, मदतनीस, आशा सेविका व ग्रामस्थ उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : प्रतिनीधी आदिवासी बालिकेला पैशाचे आमिष दाखवून तिचा विनयभंग केल्याची घटना तालुक्यातील एकलहरे येथे १३ रोजी सकाळी १० वाजता रस्त्यावरील...
-
धुळे प्रतिनिधी - स्व.सुताम पिंगळे मेमोरियल ट्रस्ट, धुळे संचलित श्रीमती शांताबाई पिंगळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापिका ...




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा