Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ३० ऑगस्ट, २०१९
रंजाणे जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण
शिंदखेड़ा (प्रतिनिधी) (राहूल पाटील) शिंदखेड़ा तालुक्यातील विरदेल केंद्रातील जिल्हा परिषद शाळा रंजाणे येथे विरदेल केंद्राचे केंद्रप्रमुख मोतीलाल पाटील यांच्या हस्ते शालेय परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला या वेळी शालेय व्यस्थापन समिती अध्यक्ष कैलास बोरसे ,उपाध्यक्ष सुभाष वाडीले,सरपंच दिपक ठाकरे,संदीप ईशी,ग्रामस्थ उपस्थित होते
वृक्षा रोपण कार्यक्रम यशस्विते साठी शाळेचे मुख्याध्यापक विश्वनाथ
विटकर सहायक शिक्षक सुधीर ढिवरे,रविंद्र वाघ सागर पाटील यांनी परिश्रम घेतले
जिल्हा परिषदच्या विद्यार्थ्यां कडून पुरग्रस्तना मदत
शिंदखेड़ा (प्रतिनिधी)( राहुल पाटील) राज्यातील कोल्हापुर,सांगली,सातारा या जिल्ह्यात महापुर आल्याने तेथील लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून त्यांना संपूर्ण राज्यातील जनतेकडुन आर्थिक मदतीचा ओघ सुरु आहे.
अशीच आर्थिक मदत शिंदखेड़ा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा अमळथे येथील विद्यार्थ्यांनी त्यांच्या खाऊचे पैसे पुरग्रस्तांसाठी मदत निधी म्हणून जमा केले असून जवळपास 1050 रुपये सर्व विद्यार्थी मिळून जमा केले. हा सर्व निधी मुख्यमंत्री सहायता निधी मधे चेक द्वारे जमा करण्यात येणार असल्याचे मुख्याध्यापक देवानंद आत्माराम पवार यांनी सांगितले.सदर निधी जमा करतांना सहायक शिक्षक विनोद पाटील, पंढरीनाथ पांढरे, विद्या पाटील यांनी सहकार्य केले
शिंदखेड़यात विविध मागण्या बाबत तहसीलदार यांना निवेदन
शिंदखेड़ा (प्रतिनिधी)( राहुल पाटील ) महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय कर्मचारी शिक्षक शिक्षकेत्तर समन्वय समिती मार्फत शिंदखेडा तहसीलदार साहेबराव सोनवणे यांना विविध मागण्यांचे व लाक्षणिक उपोषणाचे निवेदन देण्यात आले.सदर निवेदन हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात येणार आहे
2005 नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना मिळणारी अंशदायी पेंशन योजना ही कुटुंब उध्वस्त करणारी योजना आहे.गेली १४ वर्ष हा लढा संपूर्ण ताकतीने लढला जातोय पण शासन या लढ्याकडे कानाडोळा करतोय या मागणीसह सर्व संवर्गातील त्रुटी दूर कराव्यात,खाजगीकरण, कंत्राटिकरण धोरण रद्द करून राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना कायम करण्यात यावे,केंद्रासारखे सर्व भत्ते नियमित मिळावेत,लिपिक व लेखा लिपिकाच्या ग्रेड वेतनात सुधारणा करून समान काम समान वेतन देण्यात यावे, केंद्राप्रमाणे महिलांना प्रसूती,बालसंगोपन रजा व अन्य सवलती लागू कराव्यात,पदोन्नती व सरळसेवेने करण्यात येणारी नियुक्ती यातील प्रारंभिक वेतनातील तफावत दूर करावी,राज्यातील सर्व चतुर्थ कर्मचाऱ्यांची होणारी वसुली थांबवावी,अनुकंप भरती तात्काळ विनाअट करावी,सर्व कर्मचाऱ्यांची अर्जित रजा साठवण्याची कमाल मर्यादा वाढवावी,शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नये, आरोग्य सेवेचे खाजगीकरण बंद करावे,आरोग्य विभागातील कामाचे तास निश्चित होईपर्यंत बायोमेट्रिक प्रणाली आणू नये
वरील सर्व मागण्या मान्य न झाल्यास येत्या ५सप्टेंबरपासून राज्यभर सर्व कर्मचारी काळ्या फिती लावून निषेध नोंदवतील.,तसेच ९सप्टेंबरला एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारतील आणि यानंतरही दुर्लक्ष झाल्यास येत्या११सप्टेंबरपासून सर्व कर्मचारी बेमुदत संपावर उतरतील अश्या आशयाचे निवेदन शिंदखेडा तहसीलदार यांना देण्यात आले.यावेळी धुळे जिल्हा जुनी पेंशन हक्क संघटनेचे उपाध्यक्ष धिरज परदेशी,सरचिटणीस सतीश भुजबळे, सदस्य प्रमोद पाटील,हेमंत शेवाळे,नरेंद्र पाटील,कुणाल कापूरे,सुरज गिरासे,प्रशांत भलकार आदी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा