Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ८ ऑगस्ट, २०१९
Home
/
Unlabelled
/
शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथे दहा दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे मातीच्या घरांची पडझड
शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथे दहा दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे मातीच्या घरांची पडझड
दोंडाईचा (प्रतिनिधी )
शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथे दहा दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे मातीच्या घरांची पडझड झाली असून सिमेंटच्या छताच्या घरांना सुद्धा गळती लागली आहे त्यामुळे प्रशासनाने त्वरित पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे भडणे
परिसरात दहा दिवसापासून संततधार पावसामुळे मातीच्या घरांचे मोठया प्रमाणावर नुकसान होत आहे पाऊस थांबत नसल्यामुळे भडणे येथील शेतकर्यांचे संजय पाटील, राजाराम पाटील, भैय्या माळी, दयाराम माळी, राजू ठाकूर,
हिरालाल ठाकूर, कौतिक शिंदे, रमेश पाटील आदी शेतकऱ्यांचे घरे पडल्याने संसार उद्ध्वस्त झाला आहे,आदींचे मातीचे घर पडले असून मोठे नुकसान झाले आहे. हि घटना दि.8 रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडली आहे. मात्र यात कुठलीही वित्तहाणि झाली नसल्याचे वृत्त आहे
सुरुवातीला पावसामुळे मातीची घरं गळत असल्याकारणाने भीतीचे वातावरण होते यामुळे या घरात कुणीही न थांबता बाहेर पळाले यामुळे कुठलीही इजा झाली नाही. काही शेतकऱ्यांचे घराच्या भिंतीजवळ बांधलेल्या गुरांना वर भित पडलेल्याने काही जनावर जखमी झाले आहेत.त्यांना बाहेर काढण्यात गावातील ग्रामस्थांनी काढले
.मात्र संततधार पावसामुळे अखेर काही घर पडली तर काही घर शेतकऱ्यांनी घरांवर प्लास्टिकचा कागद आधार घेऊन घरांवर टाकले आहेत. त्यामुळे आपली घरे पडणार नाही मात्र संततधार पाऊस चालू राहिल्यास आणखी काही घरांचे नुकसान होईल असे दिसून येते प्रशासनाने त्वरित पंचनामे करून घर मालकांना आर्थिक मदत देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. हि सविस्तर वृत्त भडणे येथील पोलीस पाटील युवराज माळी यांनी तलाठी संपर्क साधून कळविण्यात आहे. गेल्या पंधरा
दिवसांपासून संततधार सुरू असल्याने घरांना गळती सुरू झाली आहे. सिमेंटच्या छताच्या घरांना सुद्धा गळती सुरूवात झाली आहे. भितीदायक वातावरण निर्माण होत आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा