Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २२ ऑगस्ट, २०१९

शिरपूर येथे तेली समाज युवक आघाडी तर्फे जिल्हास्तरीय गुणगौरव व सत्कार समारंभाचे आयोजन..





शिरपूर :-(प्रतिनिधी) अखिल भारतीय तैलिक समाज युवक आघाडी,धुळे यांच्या वतीने शिरपूर येथे दि.१५  सप्टेंबर २०१९ रोजी तेली समाजातील गुणवंतांचा जिल्हास्तरीय गुणगौरव व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आलेले असून यात धुळे जिल्ह्यातील तेली समाजातील गुणवंत विद्यार्थी व पुरस्कारार्थीनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन नासिक विभागीय तेली समाज युवक आघाडीचे विभागीय अध्यक्ष शामकांत ईशी (शिरपूर)व युवक आघाडीचे धुळे जिल्हाध्यक्ष सुनिल चौधरी(शिंदखेडा ) व पदाधिकारी यांनी केले आहे.

त्यात सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात इ.१० वी  व १२ वीत ६० टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त करणारे तसेच इतर पदवी, पदविका व पदवित्तर, फार्मसी, वैद्यकीय,पि. एच. डी., नेट-सेट परीक्षा पास झालेल्या तेली समाजातील विद्यार्थी- विद्यार्थिनींना  पालकांसह व विविध क्षेत्रात पुरस्कार, प्राविण्य मिळविलेल्या व्यक्तींचा सन्मानचिन्ह,  प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. तसेच विविध खेळ, सामाजिक व शैक्षिणक क्षेत्रात नामोउल्लेख कार्य करणाऱ्या बंधू भगिनींनीचाही सत्कार यावेळी करण्यात येणार आहे.                      
 तरी आवश्यक गुणपत्रकांची झेरॉक्स त्यामागे पालकांचे पूर्ण नाव, पत्ता व मोबाईल नंबर खाली दिलेल्या  नावांशी किंवा त्यात्या ठिकाणच्या समाज अध्यक्षांकडे सम्पर्क साधून दि 31 ऑगस्ट 2019 च्या आत जमा करावेत असे अवाहन नासिक विभागीय अध्यक्ष शामकांत ईशी शिरपूर(9850040722),जिल्हाध्यक्ष सुनिल चौधरी शिंदखेडा(9423494950),विभागीय उपाध्यक्ष दिपक चौधरी(9423194831), विभागीय सरचिटणीस प्रा.उमेश चौधरी (9860959417),शिरपूर तालुकाध्यक्ष दुर्गेश चौधरी(9850501957),राजेंद्र चौधरी,(9421524858)सुनील चौधरी(9822430223) साक्री तालुकाध्यक्ष धनराज चौधरी (9881231781),विजय चौधरी(9604201777),
शिंदखेडा तालुकाध्यक्ष धनराज चौधरी (9823387224),
धुळे महानगर येथे राजेंद्र बागुल (9422289954),युवराज महादू चौधरी (9823042601)कैलास आधार चौधरी(9922589999), चिरंजीवी चौधरी,दोंडाईचा (7588517405),ऍड. सचिन चौधरी(दोंडाईचा), नरेशआप्पा चौधरी, अशोक चौधरी(वाडीभोकर),विलास आण्णा चौधरी(फागणे),सुभाष चौधरी(मुकटी),किशोर चौधरी (लामकाणी),दौलत चौधरी(वरखेडी), भटू नेरकर, अनिल चौधरी(कुसुबा),सुनिल चौधरी(रतनपुरा, बोरकुंड),सुनिल चौधरी(आर्वी),डॉ. नितीन चौधरी(नरडांना),सुभाष चौधरी(चिमठाणे),कैलास बोरसे(रेवाडी),प्रशांत सूर्यवंशी,विजय चौधरी (पिंपळनेर),प्रभाकर सोनवणे (दहिवेल), अनिल चौधरी (कासारे), गोकुळ चौधरी (निजामपूर),अशोक चौधरी(वाघाडी),भुपेश चौधरी(थाळनेर),महेंद्र चौधरी(होलनांथे),अशोक चौधरी(दहिवद),दगडू चौधरी(भाटपुरा),अशोक चौधरी(उंटावद),गोपाल चौधरी(टेकवाडे),शिरपूर येथील रमेश चौधरी, प्रकाश चौधरी, महेश चौधरी, आशिष चौधरी, चेतन चौधरी, जयेश चौधरी, सुनिल चौधरी, दिनेश चौधरी व युवक आघाडीचे तसेच श्री संताजी महाराज मित्र मंडळ व श्री विघ्नहर्ता संताजी प्रतिष्ठान शिरपूर यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध