Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २२ ऑगस्ट, २०१९
धुळे जिल्हा सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस....
खान्देशना लोके पका शेत ज्यानी साथ दि त्याना सोबतच खान्देशना लोके राहतीन :- मंत्री जयकुमार रावल...
डॉ जितेंद्र ठाकूर यांनी मुख्यमंत्रींना शिरपूर संवाद यात्रेचा अहवाल केला सादर...
महाजनादेश यात्रा आज धुळे व नंदुरबार जिल्ह्यात आली होती. आज धुळे येथे रोडशो नंतर महाजनादेश यात्रा दोंडाईचा येथे मुख्यमंत्री यांच्या हस्ते सभा घेण्यात आली.यावेळी डॉ जितेंद्र ठाकूर यांनी शिरपूर तालुक्यातील संवाद यात्रेचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेच्या सभेत बोलतांंना म्हणाले की,दोंडाईचा शहराचा प्रेमात पडलो,दोंडाईचा शहरामध्ये महाजनादेश आल्यानंतर ऐतिहासिक स्वागत केले.मुख्यमंत्री बोलतांना पुढे म्हणाले की,आम्ही विरोधी पक्षात असतो तेव्हा संघर्ष यात्रा काढतो पक्षात असतो तेव्हा संवाद यात्रा काढतो.गेल्या पाच वर्षा मध्ये या सरकारने जनतेचे आशा आकांक्षा पुर्ण केलीत,यावेळी अडचण अव्हाणाला पुढे गेलो मात्र समजासाठी काम करत गेलो.महाराष्ट्र राज्य प्रत्येक क्षेत्रात देशातले नंबर एकचे राज्य बनले.राज्यात रोजगार,आरोग्य,शिक्षण यासह सगळ्यात जास्त रस्ते,पुल,घर,रेल्वे सगळ्यात जास्त काम करत पुर्ण केलीत.सरकार प्रत्येक अडचणीत शेतकऱ्यांच्या पाठीशी आहेत.सरकारने १५ हजार कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात दिले.सिंचनाच्या क्षेत्रात राज्यात मोठे काम केलेत.१५ ते २० वर्षातील अपूर्ण प्रकल्प हे सरकारने पुर्ण केलेत.सुलवाडे जामफळ प्रकल्पाचे आजतोवर स्वप्न दाखवले गेलेत मात्र मंत्री जयकुमार रावल, मंत्री सुभाष भामरे यांच्या पाठपुरावाने कोट्यावधी निधी देऊन धुळे जिल्हा सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
मंत्री गिरीश महाजन यांच्यामुळे खान्देशचे सर्वच जलयुक्त शिवारचे काम करून पुढील पाच वर्ष दुष्काळ मुक्त करण्याचे मोठे काम करणार आहेत. यापुढे मेघा रिचार्ज करून खान्देश दुसष्काळ मुक्त करू,पाच वर्षात ३० हजार ग्रामीण रस्त्यांचे काम केली.७ लाख ग्रामीण तर ५ लाख शहरी भागात घरे दिली.२०२२ पर्यंत प्रत्येकाला राहते घर असेल असे स्वप्न नरेंद्र मोदींचे आहेत.इंदौर-धुळे- मनमान रेल्वे प्रकल्पाचे
काम.सरकारने सुरु केलेत.१८ हजार गावात पिण्याचे पाणीची योजना दिली या आधी फक्त ३ हजार गावात पाणीची योजना विरोधी सरकारने केलीत.३० वर्षात जे दिले नाही त्या पेक्षा जास्त दोंडाईचा नगरपालीकेला निधी देण्यात आला.शहर,गांव, बदलण्याचे काम करत आहोत. सरकारने क्रांतीकारी काम करत १५ आँगस्टला जम्मू काश्मीर व लढाकला पत तिरंगा झेंडा फडकवला जे कोणी विचार केले नव्हते ते भाजप सरकारने केले.
५ वर्षात महाराष्ट्रात मोठे परिवर्तन केले. पुढे देखील महाराष्ट्र युरोप सारख्या देशाशी स्पर्धा करेल.राज्यात
समस्या खुप आहेत.आणि या समस्या संपवण्यासाठी युतीचे सरकार प्रयत्न करत आहेत.असे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
यावेळी महाजनादेश यात्रेच्या सभेची सुरवात पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी केले ते बोलतांना म्हणाले की,खान्देशना लोके पका शेत ज्या साथ राहतीन त्यासना सोबत आमना खान्देशना लोके सोबत राही अस म्हणत रावल पुढे म्हणाले की, चाळीस वर्षानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री हे जनतेला भेटायला आपल्या पर्यंत
आलेत.बुराई नदी ही बारमाई करण्याचा संकल्प मुख्यमंत्रींंनी पुर्ण केला, पाच वर्षात महाराष्ट्र भर हजारो कोटी रूपयेचा निधी दिला,दुष्काळ मुक्त करण्याचा संकल्प मुख्यमंत्रींंनी घेतला आहे.७० वर्षे जे स्वप्न बघीतले होते ते आता ५ वर्षात पुर्ण केलीत.महाजनादेशचे दुसरा टप्पाचा पहिला मान धुळे नंदुरबारला दिला त्यामुळे मुख्यमंत्री यांचे जयकुमार रावल यांनी आभार मानला.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा