Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, १८ ऑगस्ट, २०१९

*अन्यथा नगरपालीके बाहेर आंदोलन करू- डॉ ठाकूरांचे संवाद यात्रेदरम्यान महिलांना आश्वासन...*






शिरपूर (प्रतिनिधी)  जनतेचे समस्या वेळेवर नाही सोडवले तर नगरपालीके बाहेर आंदोलन करू,अतिक्रमणधारकांचा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस यांच्या कडे पाठपुरावा करून अतिक्रमणधारकांचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न वेळोवेळी केला असे डॉ जितेंद्र ठाकूर यांनी संवाद यात्रेदरम्यान शहरातील क्रांतीनगर येथील महिलेंशी संवाद साधतांना सांगितले.

सवांद यात्रा आज शिरपूर शहरातील क्रांतीनगर येथे आली होती. यावेळी अनेक महिलांनी आपले म्हणने मांडले.यावेळी एका दिव्यांग मुलीने तिच्यावर होणाऱ्या त्रासाची व्यथा डॉ जितेंद्र ठाकूरांसमोर मांडल्या दिव्यांग माधुरी दगाजी सोनवणे नगरपरिषदेच्या गार्डन मध्ये शिपाई म्हणून गेल्या सहा वर्षा पासून कार्यरत असतांना तीच्या घरात तिची व्रुध्द आई व ती राहते वडील वारलेत.अशा बिकट परिस्थितीत व हलाकीची परिस्थिती असल्याने दिव्यांग माधुरी सोनवणे यांना नगरपालिकेने कायमस्वरूपी कार्यरत करून घ्यावे.वारंवार नगराध्यक्ष यांना सांगून देखील कोणीही दखल घेत नसल्याचे सांगत माधुरी सोनवणे या तरूणीला अश्रु अनावरण झाले.

यासोबत काहींंचे रस्ते,रेशनकार्डासह अतिक्रमणधारकांचा प्रश्नासह अनेक समस्या यावेळी महिला व नागरिकांनी डॉ जितेंद्र ठाकूर यांच्या समोर मांडल्या
 काही भागात नगरपालीकेचे कचरागाडी येत नसल्याने जनतेला त्रास सहन करावा लागतो याबाबत महिलांनी कैफियत 

मांडली.तेथून महिलांचे म्हणने ऐकून भाजपाचे जिल्हाध्यक्ष बबन चौधरी व डॉ जितेंद्र ठाकूर यांनी आरोग्य अधिकारी यांना संपर्क सांधून याबाबत त्वरित प्रश्न सोडावावा सांगण्यात आले.प्रत्येक गल्लीबोळात फिरून समस्या डॉ जितेंद्र ठाकूर संवाद यात्रेदरम्यान जाणून घेत आहेत.

डॉ जितेंद्र ठाकूर
तालुका भाजपा प्रभारी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध