Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, १८ ऑगस्ट, २०१९

*शिरपूर शहरात डॉ.ठाकूर यांच्या सवांद यात्रेला सुरुवात*







शिरपूर (प्रतिनिधी )शिरपूर येथे आज दि १७ पासून संवाद यात्रेला सुरवात करण्यात आली.शिरपूर तालुक्यातील ग्रामीण भागानंतर डॉ जितेंद्र ठिकूर यांच्या आयोजनाखाली या संवादयात्रेची शहरात सुरवात करण्यात आली.

जनतेचे प्रश्न समजुन घेत त्या सोडवण्याचा प्रयत्न या संवाद यात्रेदरम्यान दरम्यान डाँ जितेंद्र ठाकूर करणार आहेत. दि १२ जुलै रोजी आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर तालुक्यातील प्रतीपंढरपुर बाळदे येथून यासंवाद यात्रेला सुरवात करत तालुक्यातील संपूर्ण ग्रामीण भाग पिंजुन काढत सर्व सामान्यांचे प्रयत्न सोडवण्याचा व समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.शेतकरी, घरकुल,शौचालय, रेशकार्ड, पाणी प्रश्न यासह असंख्य प्रश्न यावेळी डॉ जितेंद्र ठाकूर यांच्या समोर मांडण्यात आल्या ग्रामीण भागात २१ दिवस चालणारा या संवाद यात्रेची सांगता करत आज दि १७ रोजी दुपारी ५ वाजता शहरातील क्रांतीनंगर,कन्या शाळा, जनता 
नगर,भरतसिंग नगर,धाकड गल्ली,माळी गल्ली,जैन गल्ली पां.बा.मा. हायस्कूल,आदी भागात जाऊन संवाद यात्रे मार्फत समस्या जाणून जनतेशी संवाद साधण्याचा डॉ जितेंद्र ठाकूरांनी प्रयत्न केला.

यावेळी सोबत भाजपा जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, भाजपा नगरसेवक चंदन पाटील, नगरसेवक राजेंद्र गिरासे,नगरसेवक रोहीत रंधे, नगरसेवक मोनिका शेटे,प्रविण पाटील,नंदा अहिरे,अमित जैन,
मिलींद पाटील,हेमराज राजपूत, विकी चौधरी,महेंद्र पाटील, रोहित शेटे,संजय आसापूरे, आबा धाकड,युवक मित्र मंडळ,भाजपचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने,उपस्थित होते.

शहरातील प्रत्येक भागात जाऊन तेथील महिला व्रुध्दांसह जनसामान्यांचा प्रश्न जाणून त्या सोडवण्याचा प्रयत्न या संवाद यात्रेदरम्यान करण्यात येणार आहे.

डॉ जितेंद्र ठाकूर 
भाजपा तालुका प्रभारी,शिरपूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध