Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १६ सप्टेंबर, २०१९
Home
/
Unlabelled
/
आमदारकीचे डोहाळे लागलेले हवसे, गवसे ,नवसे दहिवद येथील महापुरुषांचे प्रतिमा पुजन करतांना चुकले.
आमदारकीचे डोहाळे लागलेले हवसे, गवसे ,नवसे दहिवद येथील महापुरुषांचे प्रतिमा पुजन करतांना चुकले.
पंकज पाटील (उपसंपादक तरुण गर्जना)
ज्यांना या
महाराष्ट्राचा इतिहास माहित नसेल , ज्यांनी आपल्या जन्म भूमीत स्वतः शासकीय सेवेत असतांना
गावासाठी व आपल्या लोकांसाठी काहींही केलेले नसेल अश्या लोकांना अमळनेर
तालुक्याच्या विकासाची धुरा देतांना विचार
करा .लोकशाही फक्त पैश्यावर विकली जाते असा उद्देश ठेवून अमळनेर तालुक्यात राजकीय
करियर घडविणा-याना अद्दल घडविल्याशिवाय राहू नका. अमळनेर तालुक्यात लोकशाही जिवंत
आहे... हे आपल्या मतदानातून दाखवल्याशिवाय स्वस्त बसू नका .
या मातृभूमीत
जन्माला आलेल्या महापुरुषांच्या पूजनाचा क्रम ज्यांना कळत नाही अश्या हवसे ,गवसे,नवसे यांना
अमळनेर तालुक्यातील आमदारकीचे डोहाळे लागले आहेत. दहिवद येथील ग्रामपंचायत कार्यालया
समोर छत्रपती शिवाजी महाराज ,क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले , क्रांतीज्योती आई
सावित्रीबाई फुले यांचे स्मारक व बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे.
या पवित्र
भुमीचा इतिहास सांगतो... बाबासाहेब
आंबेडकर यांचे गुरु महात्मा ज्योतिबा फुले होते व क्रांती सूर्य ज्योतिबा फुले
यांचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज होते . त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या
प्रतिमेचे पुजन झाल्यानंतर क्रांती सूर्य ज्योतिबा फुले यांचे पुजन होणे
क्रमप्राप्त होते. शिवाजी महाराज यांच्या पुजनानंतर बाबासाहेब यांचे पुजन व शेवटी
क्रांती सुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे पुजन केले गेले .यावरून त्यांना
महाराष्ट्राचा इतिहास किती माहित आहे हे दिसून येते . आज दहिवद गावांत तोंड ओळख करण्यास आलेले हवसे,गवसे ,नवसे यांना महापुरुषांचा
क्रमाचा विसर पडला .निवडून आल्यानंतर त्यांना अमळनेरच्या जनतेचा विसर पडणार नाही
याची काय हमी .त्यांचा भाषणात अमळनेरच्या विकासाचे कोणतेही हित व दृष्टीकोन नव्हता.” फक्त बोलाचा भात व बोलाची कढी “ असाच अभ्यास दिसून आला.
त्यांच्या
बाबतीत मला ....
संत कबीर
यांचा दोहा आठवतो .
पोथी पढ़ी पढ़ी जग मुआ ,पंडित भया
ना कोई !
ढाई आखर प्रेम का ,पढ़े सो पंडित
होय !
आपल्या
तालुक्यातील आजही उच्च पदावर असलेल्या अधिकारी ,कर्मचारी यांनी आपली प्रशासकीय
सेवा सांभाळून देखिल गांव विकासाचा विळा
उचलला असून गांव स्वयंपूर्ण करण्यासाठी ते प्रयत्न करत
आहेत . त्यांच्या
त्या प्रयत्नांना आज यश आले
आहे . मारवड विकास मंच ,जवखेडा विकास मंच ,पातोंडा
विकास मंच ,दहिवद विकास मंच ,शिरूड विकास मंच ,रणाईचे विकास मंच या मंचात काम
करणारे अधिकारी आज ही उच्च पदावर आहेत . गावासाठी व तालुक्यासाठी तळमळीने गांव
विकासाचा प्रयत्न करणारी अशी माय भुमितली माणसे भविष्यात राजकारणात आली तर नवल ठरणार नाही
.
पण ज्यांनी स्वत:च्या गावांत फक्त
मंदिरच बांधली असतील व सेवेत
असतांना गावाकडे ढुंकूनही पाहिले नसेल असे
हवसे,गवसे,नवसे अमळनेरचा किती विकास करतील याचा अभ्यास व विचार अमळनेरच्या जनतेने करणे गरजेचे आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा