Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २१ सप्टेंबर, २०१९

मौजे लांजी ता.अहमदपूर एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पा अंतर्गत सुसुरेशा अंगणवाडी लांजी क्र.2







अहमदपूर प्रतिनिधी गजानन आनंतवाळ
मध्ये पाककृती स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य म्हणजे विविध पदार्थांचे या वेळी सरपंच रुक्मिन कदम उपसरपंच कालीदास कदम, युवा नेते रामानंद मुंडे लांजीकर,मुख्याध्यापक कासले सर,शेळके मॅडम,  आस्वाद घेत स्पर्धेत सहभागी असलेल्या स्पर्धकांची निवड करून पहिला क्रमांक पल्लवी गोरख अनंतवाळ, दुसरा राधा दशरथ हिवरे, तिसरा शालिनी नवनाथ चिलकरवार असे स्पर्धक निवडले व परितोषक देण्यात आले.या वेळी सौ.सत्यभामा व्यंकटी अनंतवाळ अंगणवाडी कार्यकर्ती,मंगल रामकिशन पवार अंगणवाडी मदतनीस  दंडिमे एस.व्ही पर्यवेक्षिका किनगांव यांनी परिश्रम घेतले या वेळी माता पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


----------------------------------------------

सौर ऊर्जा ही काळाची गरज आ.विनायकराव पाटील.                           
 



                                                अहमदपुर ( प्रतिनिधी) सध्या विद्युत पुरवठा सुरळीत होण्यासाठी अनेक ठिकाणी अडचणी निर्माण होत आहेत. त्याचा परिणाम शासकीय कार्यालयत कामजावर होत आहे त्यासाठी सौर ऊर्जेचा वापर करून कामकाज सुरळीत ठेवता येते त्याठी सौरऊर्जा ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार विनायकराव पाटील यांनी केले. 

 महाऊर्जा अंतर्गत अहमदपुर येथिल  विविध शासकीय कार्यालयावर 50 लाख रु.च्या सौर ऊर्जा सोलार रुप टाॅपचे भुमीपुजन  आमदार विनायकराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.   तहसिल कार्यालयात झालेल्या कार्यक्रम प्रसंगी माजी आ.बब्रुवान खंदाडे उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे ,महाउर्जाचे व्यवस्थापक देविदास कुलकर्णी , उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.अश्वीनीताई पाटील,   तहसिलदार सौ.अरूणा संगेवार ,चाकुरचे तहसिलदार श्री बिडवे ,  गटविकास अधिकारी ढवळशंक , श्री  देशमुख ॕडॉ.  सुरजमल सिंहाते ,भाजपचे तालुका अध्यक्ष रामभाऊ बेल्लाळे ,पं.स.सदस्स कमलाकर पाटील , निळकंट होनराव पाटील ,माजी जिल्हा परिषद सदस्य हणमंतराव पाटील,बबनराव हांडे  ,गोविंदराव गिरी ,  चंद्रकांत गंगथडे ,चेअरमन यतिराज केंद्रे ,सुधीर गोरटे,रामभाऊ नरवटे ,सुखदेव कदम, विठ्ठल मुले यांच्यासह  सर्व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते व अधिकारी ,कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते होते.येथील तहसील कार्यालय, ग्रामीण रुग्णालय, पंचायत समिती, जिल्हा सत्र न्यायालय ,पशुवैद्यकीय रूग्णालय अदि शासकीय कार्यालयावर सोलार बसविण्यात येणार आहेत. त्या सर्व कार्यालयावरील सौर उर्जा प्रकल्पाचे भूमिपूजन आमदार विनायकराव पाटील यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध