Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २१ सप्टेंबर, २०१९

रोटरी क्लब चोपडा तर्फे ११ शिक्षक नेशन बिल्डर अॅवार्डने सन्मानीत





चोपडा:प्रतिनिधी:विनोद निकम 
रोटरी इंटरनॅशनल या विश्वप्रसिद्ध सेवाभावी संस्थेच्या भारतातील ३०३०डिस्ट्रीक मधील
 रोटरी क्लब चोपडा तर्फे राष्ट्र घडणीत महत्त्वाचे योगदान 
देणा-या शिक्षकांप्रतीचा आदर, कृतज्ञता व्यक्त करण्यासह चांगले काम करणा-या शिक्षकांना प्रोत्साहित करण्याच्या भावनेतून शिक्षक दिना प्रित्यर्थ ११ शिक्षकांना "नेशन बिल्डर अॅवार्ड " चे नुकतेच वितरण सोहळा संपन्न झाले.

चोपड्याचे तहसिलदार रावसाहेब
श्री.अनिल गावित यांच्या शुभहस्ते व सहप्रांतपाल अभियंता विलास एस पाटील तसेच चोपडा रोटरी क्लब अध्यक्ष नितीन जैन व मानदसचिव धीरज अग्रवाल, सोहळा प्रकल्प प्रमुख संजीव गुजराथी,नितीन अहिरराव यांच्या प्रमुख उपस्थितीत पुढील ११ शिक्षकांना नेशन बिल्डरअॅवार्ड ने सन्मानीत करण्यात आले. पुरस्कारार्थी शिक्षक -
प्रा.डॉ.ए.एल. चौधरी 
( म. गांधी महाविदयालय )
मयूरेश सोनवणे ( बालमोहन विदयालय ) श्रीमती विजया पाटील ( कस्तुरबा विद्यालय ) ,
रतन मानेसर ( पंकज माध्य.), श्रीमती रत्ना पाटील ( क्लारा इंग्लिश्)
हेमराज पाटील ( विवेकानंद माथ्य. ) दीपाली धनगर ( महिला मंडळ ) एन्. वाय. मलिक ( प्रताप विदया मंदिर ), कला शिक्षक नरेंद्र पाटील
( जय श्री दादाजी हायस्कूल तांदळवाडी ), शरद जगताप ( शा. शि. पाटील माध्य. चहार्डी ) रोटे.भालचंद्र पवार ( सत्रासेन माध्य. आश्रमशाळा ) या वरोल्लेखित शिक्षकांना शॉल, मणिमाळ व गौरवपत्र फ्रेम देऊन सपत्नीक सन्मानीत करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी तहसिलदार अनिल गावित यांनी मी पण जि.प. , नवोदय तसेच आदिवासी आश्रमशाळेतून शिक्षण घेत घडलोय त्यामुळे आश्रमशाळेतील शिक्षकाचीही नेशन बिल्डर अॅवार्ड देऊन गौरव होतांना पाहून आनंद होतोय असं म्हणत उपस्थितांना मोजक्या पण प्रभावी शब्दात मार्गदर्शन केले. सत्कारार्थी मधून हेमराज पाटील, दीपाली धनगर व एन्. वाय. मलिक यांनी मनोगत व्यक्त केले. नगर वाचन मंदिरात संपन्न झालेल्या ह्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष रोटे. नितीन जैन यांनी , आभार सचिव रोटे. धीरज अग्रवाल तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राधेश्याम पाटील सरांनी केले. 
याप्रसंगी प्रा.विलास पी पाटील, एम्.डब्ल्यू पाटील,आशीष गुजराथी प्रफुल्ल गुजराथी,डॉ वारके,अशोक जैन धीरेंद्र जैन, विलास कोष्टी, महेंद्र बोरसे सर, CAपवन गुजराथी, शिरीष पालीवाल, जितेंद्र बोथरा, निखिल सोनवणे व अनेक रोटरी सदस्य व मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध