Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २१ सप्टेंबर, २०१९

कृषिदुतांनी साकारले रांगोळीत पिंपळवंडी





नारायणगाव,ता.जुन्नर प्रतिनिधी निखिल राजपूत 
दि. 20 सप्टेंबर 2019जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे जिल्हा परिषद शाळा मध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी सलग्न कृषी महाविद्यालय, पुणे 05 येथील कृषीदुतांनी ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद शाळा मध्ये मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट रोजी सकाळी ठीक ११ वाजता गावचा नकाशा रांगोळीने काढून एक आगळीवेगळी रांगोळी सादर केली.
या रांगोळी मध्ये गावाचा परिसर रस्ते, घरे, मंदिरे, कुकडी नदी,
कॅनल, विहीर, शेततळे, पुल व मळगंगा माता मंदिर, मज्जित व
वेगवेगळ्या वस्त्या इतर बाबी रांगोळ्यांमध्ये दाखविण्यात
आल्या आहेत. त्यावेळी पिंपळवंडी येथील नागरिक मोठ्या
संख्येने उपस्थित होते. पिंपळवंडी ग्रामस्थांनी कृषिदुतांचे
कौतुक करून अभिनंदन केले. या कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालयाच्या प्रा डॉ. पाटील सर, प्रा डॉ. कारंडे सर, यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदुत रुपेश आगळे, गौरव गाढे, ऋषिकेश होनमणे, अजय गावंडे, गोपाल आरमाळ, किरण ढाकणे यांनी
आठ बाय आठ फुटाची आकर्षक रांगोळी सादर केली.
रांगोळी पाहण्यासाठी गावातील सरपंच सोमनाथ माळी,जि.प. शाळेचे मुख्याध्यापक हनुमान हांडे, श्रीकांत भालेराव, मनिषा भुजबळ, जया गोरडे  व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध