Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, ३० सप्टेंबर, २०१९

आम आदमी पक्षाचे 7 उमेदवाराची नावे जाहीर करण्यात आले आहे




जळगाव :प्रतिनिधी: योगेश भोई 
दुसऱ्या यादीत आम आदमी पक्षाचे 7 उमेदवाराची नावे जाहीर करण्यात आले आहे त्यातून उत्तर महाराष्ट्र मधून नवापूर विधानसभा डॉ सुनील गावित यांना उमेदवारी जाहिर केली गेली आहे .डॉ. सुनील गावित यांचा  कोणताही राजकीय वारसा नाही, ते सर्वसामान्य गरिब आदिवासी कुटुंबातील व्यक्तीला आम आदमी पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे.उच्च सुशिक्षित व्यक्तिमत्त्व आहे, समाजासाठी झटणारे व सेवा करण्याचा मानस आहे

(2)-------------------------------------------
भाजपा  शिवसेना युती संपुष्टात
-----------------------------------------------
 

जळगाव, प्रतिनिधी – घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यात भाजपा शिवसेना युती ची घोषणा होणे अपेक्षीत होते. मात्र घटस्थापना उलटल्यानंतर देखील युतीची घोषणा झालेली नाही. यावरून पडद्याआड काहीतरी वेगळ्याच हालचाली सुरु असल्याचे समोर येतेय. मुख्यमंत्री फडणवीस हे युतीसाठी आग्रही असल्याचे समजते. तर दिल्‍लीश्‍वरांची मनस्थिती काहीशी वेगळी आहे. काल नवीदिल्लीत भाजपाच्या उमेदवार निश्चितीसाठी बैठक झाली तेव्हा दिल्लीतील श्रेष्ठींनी संपूर्ण 288 मतदारसंघाची यादी मागितली. इकडे शिवसेनेने युतीची घोषणा होण्या अगोदरच आपल्या उमेदवारांना एबी फॉर्म वितरित करण्याचा सपाटा लावला. त्यातच शिवसेनेचा प्रखर विरोध असलेल्या स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा भाजपा प्रवेश सेनेच्या नाकावर टिच्चून दि.2 ऑक्टोबर रोजी होत आहे. यावरून वरवर दिसणारे चित्र वेगळे असले तरी पडद्यामागे काहीतरी हालचाली सुरु असल्याने राजकीय वर्तुळात भाजपा शिवसेना युती संपुष्टात येत असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. 
विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजप – शिवसेनेची युती होईल असे दोन्ही पक्षाचे नेते मंडळी आर्वजून सांगत आहेत. युतीसाठी मुख्यमंत्री व शिवसेनेचे प्रमुख उध्दव ठाकरे यांच्यात जागा वाटपा संदर्भात चर्चा देखील झालेली आहे. परंतु काल शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी युतीची घोषणा होण्या अगोदरच शिवसेनेच्या उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करून त्यांना एबी फार्म देखील दिल्याने आता युती होते किंवा नाही असा प्रश्‍न दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्याना पडला आहे. तसेच दिल्‍लीत ना. अमित शाह यांच्यासह वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत विधानसभेच्या 288 उमेदवारांच्या नावाची यादी तयार करण्यात आली आहे.
भाजप – सेनेची युती व्हावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेनेचे उध्दव ठाकरे यांच्याशी सातत्याने संपर्क साधून जागा वाटपा संदर्भात चर्चा करून युतीसाठी आग्रह धरला होता. दिल्‍लीत वरिष्ठांनाही युती झाल्यास पक्षाला लाभ होईल अशी भुमिका मुख्यमंत्र्यांसह प्रदेशाध्यक्ष यांनी मांडली होती. सुरूवातीला वरिष्ठांनी युतीला हिरवा झेंडा दाखविला होता.

युतीला बंडखोरीची भिती
काही महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षातील मातब्बरांनी भाजपात प्रवेश केल्याने विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजप पक्षात उमेदवारी मागणार्‍यांची संख्या वाढल्याने आता कोणाला तिकिट द्यावे असा प्रश्‍न नेत्यांना पडला आहे. त्यातच निष्ठावान कार्यकर्त्यांना उमेदवारी न मिळाल्यास ते बंडखोरी करण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचा अंदाज नेत्यांना आल्याने बंडखोरीच्या भितीमुळे युती न करता स्वबळावर निवडणूक लढविण्याच्या हालचाली दिल्‍लीत सुरू असल्याचे समजते. दरम्यान शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी युतीची घोषणा होण्यापूर्वीच सेनेच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा करून त्यांना एबी फार्म दिल्याने आता युती न होण्याची शक्यता बळावली असल्याची चर्चा राजकीय जाणकारांत होत आहे. घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर युतीची घोषणा होण्याची अपेक्षा दोन्ही पक्षातील नेते मंडळींसह कार्यकर्त्यांना होती. परंतु युतीची घोषणा न होता सेनेच्या उमेदवारांच्या नावाची यादीत जाहीर झाल्याने आता भाजपाचे वरिष्ठ नेते मंडळी काय भुमिका घेतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

(3)-------------------------------------------
 शिवशाही बसकडून परत प्रवाशांचा जीव धोक्यात, लोणावळा घाटाजवळ स्टेरिंग तुटले 
-----------------------------------------------



जळगाव प्रतिनिधी.योगेश भोई 
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) खातेकडून राज्यभरात सामान्य जनतेस एसी लक्झरी बस सुविधा रास्त दरात पुरविण्याचा गाजावाजा करत राज्य शासनाने लागू केली केलेली शिवशाही बस (Shivshahi Bus) पुन्हा एकदा प्रवाशांचा जीव धोक्यात घातल्याने चर्चेत आली आहे. यावेळेस मात्र प्रवाशांचे नशीब बलवत्तर म्हणून लोणावळा घाटापासून काही मिनिटांच्या अंतरावर बसचे स्टेरिंग जॉईंट तुटले मात्र लोणावळा फूडमॉलच्या परिसरातच असा प्रकार घडल्याने सुदैवाने प्रवाशांचा जीव वाचल्याचा प्रकार घडला आहे 

स्टेअरिंगचे कनेक्शनच तुटले- 
याबाबत अधिक माहिती देताना ॲड.सिद्धार्थशंकर शर्मा यांनी सांगितले की, ‘मी बाल हक्क आयोगाची सुनावणी संपवून पुण्यात परत येत असताना शिवशाही बसमध्ये प्रवास करत असताना लोणावळ्याच्या फुडमॉलला बस थांबली. पुन्हा काही वेळाने पुण्याकडे प्रवास सुरू झाल्यावर प्रवाशांनी एसीचे तापमान खुप थंड असल्याने ते ड्रायव्हरला वाढविण्यास सांगितले, मात्र ड्रायव्हरने एसीचे तापमान वाढवताना जोरदार आवाज झाला व बसला हादरे बसून बस रस्त्यावर थांबली.’

स्टेरिंग तुटल्यानंतर रस्त्यावर थांबलेली शिवशाही बस
घाटात अपघात होता वाचला!-
‘त्यानंतर ड्रायव्हरने आम्हाला बसचे स्टेरिंग कनेक्शन तुटले असल्याने प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये प्रवास करण्यास सांगितले. सुमारे अर्ध्या तासाहून अधिक कालावधीनंतर नॉन एसी बस उपलब्ध करून देण्यात आली व कित्येक प्रवाशांना पुण्यापर्यंत उभ्याने प्रवास करावे लागला. हेच जर घाटात घडले असते तर मोठा अनर्थ झाला असता.’

मुख्यमंत्र्यांना तक्रार अन्यथा कायदेशीर कारवाई-
‘याविरोधात मी व्यक्तिशः मुख्यमंत्र्यांच्या आपले सरकार तक्रार निवारण पोर्टलला तक्रार केली असून राज्यभरात शिवशाही बसचे होणारे अपघात आणि प्रवाशांच्या जीवितास होणाऱ्या धोक्यास अनुसरून उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्याची मागणी केली असून दोषी अधिकाऱ्यांवर शास्तीची तसेच फौजदारी कारवाई करण्याची विनंती केली आहे. याबाबत राज्य सरकारने नेहमीप्रमाणे कारवाईस चालढकल केल्यास मी योग्य ती कायदेशीर कारवाई करणार आहे’ असे ही श्री.शर्मा यांनी पुढे सांगितले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध