Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १ ऑक्टोबर, २०१९
भावडी येथे कृषी दुतांकडून कडून मार्गदर्शन
पुणे प्रतिनिधी - निखिल राजपूत
भावडी (ता. आंबेगाव) येथे कृषी कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत येणाऱ्या उपक्रमांचे प्रात्यक्षिक कृषी महाविद्यालय पुणे येथील कृषिदुतांनी करून दाखविले. काढणीनंतर घ्याव्या लागणाऱ्या काळजी व व्यवस्थापनातील एक भाग म्हणून घरगुती "शून्य ऊर्जा शित कक्ष" कसे तयार करावे, याविषयी कृषी दुत आकाश मांडे, मयुर दाणे, अवधूत धुमाळ, अनिकेत राहणे, सौरभ वाघमळे, धनंजय बारवकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रगतिशील शेतकरी गुलाब कातळे, शरद कातळे, रामचंद्र सुकाळे, लाहूनाथ कातळे, सुनील नवले तसेच महिला अनिता नवले, सुभद्रा कातळे, अनिता कातळे इत्यादी उपस्थित होते.
भाजीपाला, फळे, दुग्धजन्य पदार्थ इ. थंड स्थितीत साठवण्यासाठी शून्य ऊर्जा वापरणारा शीत-कक्ष म्हणजेच झीरो एनर्जी कूल चेंबर हा एक चांगला व कमी खर्चाचा पर्याय आहे. हा शीत-कक्ष शेतावरच उभारता येतो व ताजी फळे, फुले व भाज्या त्यात साठवून बाजारात नेईपर्यंत चांगल्या अवस्थेत ठेवता येतात. अंगभूत दमटपणामुळे फळे व भाज्या फार लवकर खराब होतात. शिवाय ह्या सर्व जिवंत वनस्पती असल्याने तोडणीनंतरही त्यांची पिकण्याची तसेच बाष्प बाहेर टाकण्याची क्रिया चालूच असते. मात्र त्यांच्या साठवणुकीच्या तापमानावर नियंत्रण ठेवून खराबीचे प्रमाण घटवता येते. ह्या शीत-कक्षाची बांधणी विटा, वाळू, बांबू, गवत, पोती अशी नेहमी मिळू शकणारी साधने वापरून करता येते. ह्या कक्षातील तापमान बाहेरील तापमानापेक्षा सुमारे १०-१५ डिग्री से. ने कमी असल्याने व तुलनात्मक आर्द्रता ९०% राहात असल्याने कोरड्या ऋतूत त्याचा जास्त उपयोग होतो.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा