Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ९ सप्टेंबर, २०१९
Home
/
Unlabelled
/
दिनांक 9 सप्टेंबर 2019 सोमवार रोजी महाराष्ट्रातील राज्य शासकीय,निमशासकीय कर्मचारी व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती यांच्या मार्फ़त राज्यभरातुन एकूण 10 लाख कर्मचारी यांनी एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारला आहे.
दिनांक 9 सप्टेंबर 2019 सोमवार रोजी महाराष्ट्रातील राज्य शासकीय,निमशासकीय कर्मचारी व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती यांच्या मार्फ़त राज्यभरातुन एकूण 10 लाख कर्मचारी यांनी एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारला आहे.
प्रतिनिधी राहुल पाटील :आज दिनांक 9 सप्टेंबर 2019 सोमवार रोजी महाराष्ट्रातील राज्य शासकीय,निमशासकीय कर्मचारी व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती यांच्या मार्फ़त राज्यभरातुन एकूण 10 लाख कर्मचारी यांनी एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारला आहे.
या मधे सन 2005 नंतर बंद करण्यात आलेली जुनी पेन्शन योजना पुन्हा तात्काळ लागू करावी.कारण गेल्या 14 वर्षा पासून ही मागणी शासना कडे सुरु असून शासन पूर्णता दुर्लक्ष करीत आहेत.म्हणून हा संप असून येत्या दोन दिवसात महाराष्ट्र शासन ने दखल घेतली नाही तर 11 सप्टेबर पासून बेमुदत संप सुरु राहणार असून एकही कर्मचारी शासकीय कामकाज करणार नाही असा इशारा देण्यात आला आहे
या संप मधे शिंदखेड़ा तालुक्यातील शिक्षण विभाग,कृषी विभाग,आरोग्य विभाग,महसूल विभाग,वीज वितरण विभाग,पंचायत समीती,न्यायालय
ग्रामसेवक संघटना या सह धुळे जिल्ह्यातील सर्वच जिल्हा परिषद शाळा मधील शिक्षक,शासकीय निम शासकीय विविध विभागातील कर्मचारी संप मधे सहभागी झाले असून शिंदखेड़ा तालुक्यातील व पूर्ण धुळे जिल्ह्यातील 100% शाळा बंद आहेत त्याच प्रमाणे इतर सर्वच शासकीय निम शासकीय विभागातील कर्मचारी यांनी देखील संप मधे सहभागी होऊन जूनी पेंशन योजना तात्काळ लागू करावी अशी मागणी केली आहे.त्यांचे सुधा कार्यलयीन कामकाज आज बंद आहे
जूनी पेंशन योजना लागू करण्या बाबत संप मधे राज्यभरातुन शिक्षण विस्तार अधिकारी संघटना,केंद्र प्रमुख संघटना यांनी देखील पाठीबा दर्शविला आहे त्याच प्रमाणे या संपास प्राथमिक शिक्षकांच्या सर्वच संघटना,समन्वय समीती तसेच राज्यभरातील विविध 35 पेक्षा जास्त संघटना यांनी प्रत्यक्षरित्या पाठीबा दिला असून शिक्षकाच्या कर्मचारी यांच्या एकजुट, ताकद ओळखून महाराष्ट्र शासन ने जूनी पेंशन योजना तात्काळ लागू करून राज्यातील 10 लाख कर्मचारी यांच्या भविष्याचा विचार करावा असे आवहान करण्यात आले जर मागण्या मान्य झाल्या नाही तर 11 सप्टेबर पासून बेमुदत संप पुकारला जाणार असून याला सर्वस्वी राज्य शासन जबाबदार राहील असे शिंदखेड़ा तालुका जूनी पेंशन हक्क संघटनेचे तालुका अध्यक्ष रंजीत राठोड़ यांनी सांगितले आहे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा