Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १० सप्टेंबर, २०१९

नागलवाडी येथील महिलांनी पकडून आणली अवैध गावठी दारू;दारू विकणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल!!





प्रतिनिधी चोपडा विनोद निकम 
गावठी दारू मुळे आमच्या गावात अनेकांचे संसार उधवस्थ होत असून आज दुपारी चार वाजता थेट नागलवाडी ता चोपडा गावातून अवैध दारू विकणाऱ्या लोकांकडून पंधरा ते वीस महिलांनी दारू पकडली असून थेट चोपडा शहर पोलिस ठाण्यात दिली असून दारू विक्री करणाऱ्या सर्व पाच ते सहा जणांविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात केली आहे.

नागलवाडी गावात अवैध दारू बंद झालीच पाहिजे अश्या घोषणा पोलीस ठाणे आवारात या महिलांनी दिल्या असुन या सर्व महिला अत्यंत गरिबीच्या परिस्थितीतून रोजंदारीने काम करणाऱ्या दिसून आल्या असून या महिलांनी थेट गावठी दारूचे भरलेले ट्यूब पकडून आणले होते.
या महिलांमध्ये मीराबाई भिल,ज्योती भिल,
रेखाबाई पाटील,हिरालाल भिल,आदी सह  दहा ते पंधरा महिला यावेळी उपस्थित होत्या.

याबाबत चोपडा शहर पोलीस ठाण्यात प्रकाश मथुरे याच्या फिर्यादीवरून दारू विक्री करणारे समाधान सोनवणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




यावेळी संतप्त महिलांनी चोपडा शहर पोलीस ठाण्यात बसून नागलवाडी गावात दारू बंद झालीच पाहिजे,अश्या घोषणा दिल्या होत्या



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध