Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १ सप्टेंबर, २०१९
Home
/
Unlabelled
/
रावेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध मागण्या साठी रावेर तहसीलदार यांना दिले निवेदन. ..
रावेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध मागण्या साठी रावेर तहसीलदार यांना दिले निवेदन. ..
रावेर प्रतिनिधी अजीज शेख राष्ट्रवादी युवक काँग्रेसची बैठकीत
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष श्री रवींद्र नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली व श्री रमेश नागराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली रावेर राष्ट्रवादी युवक काँग्रेसची बैठक संपन्न झाली या बैठकीत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात आली व पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी युवक जोडो अभियान राबविण्यात येणार असल्याचे युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी सांगितले तर निळकंठ चौधरी, विलास ताठे. दिपक पाटील, रमेश पाटील, यांनी मार्गदर्शन केले.
तसेच चेंबूर, मुंबई येथील पीडित मुलीवर अत्याचार केलेल्या आरोपींना कडक कार्यवाही करण्यात यावी व
दिल्ली येथील धर्माध लोकांनीं मुस्लिम समाजाचे इमाम यांची अमानुषपणे हत्या केली या घटनेचा,तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे विटंबनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी तर्फे निवेदन देण्यात आले व आरोपींना कडक शिक्षा व्हावी यासाठी निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष किसान सभेचे सोपन पाटील, रावेर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी,प.स.सदस्य दीपक पाटील,योगेश पाटील,सचिन पाटील,शहराध्यक्ष मेहमूद शेख,माजी नगराध्यक्ष गोटू शेठ, शिवाजी पाटील ,प्रकाश पाटील,कृ.उ.बा संचालक विनोद पाटील,कार्याध्यक्ष राष्ट्रवादी रावेर
विलास ताठे,जिजाबराव पाटील,,मिलिंद चौधरी,दृष्यत पाटील हर्षल पाटील,हरीश जगताप,आकाश पाटील,विध्यार्थी जिल्हा उपाध्यक्ष अमोल पाटील,सुमित बार्हे, भूषण महाजन,योगेश पाटील,पवन पाटील,रुपेश पाटील,राजू पाटील,नईम बेग,इम्रान भाई,करीम भाई,अक्रम भाई,आदी युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा