Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १ सप्टेंबर, २०१९
अकुलखेडा येथे शॉक लागून तरुणीचा मृत्यू
चोपडा:-(प्रतिनिधी) विनोद निकम
तालुक्यातील अकुलखेडा येथील निकिता दिलीप धनगर(१८) ही दि १ रोजी सकाळी ९.३० च्या सुमारास नळाला पाणी आले असता ते भरून धुनी भांडी करून झाल्यावर मोटर बंद करायला गेली असता तिथेच तिला शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील अकुलखेडा येथे ९.३० वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे घरातील पाणी भरून झाल्यानंतर निकिता दिलीप धनगर (१८) हिने पाण्याची मोटर बंद करून पिन काढत असताना अचानक तिला विजेचा जोरदार शॉक लागला. विजेच्या धक्क्याने निकिताचा जागीच मृत्यू झाला.ती चहार्डी येथील शामराव शिवराम पाटील विद्यालयात ११वीला कला शाखेत शिक्षण घेत होती.या घटनेबद्दल गावात हळहळ व्यक्त होत आहे.ती राज्य परिवहन महामंडळाचे चालक दिलीप धनगर यांची मुलगी होती.तिच्या पश्चात आई,वडील,तीन बहिणी व भाऊ असा परिवार आहे.पुढील तपास चोपडा शहर पोलीस स्टे चे पो ना मधुकर पवार करीत आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा