Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, २५ सप्टेंबर, २०१९

अमळनेर विधानसभा मतदार संघातील झी २४ तासच्या दे दणा-दण कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा पळकुटेपणा

BY ऑनलाईन तरुण गर्जना
SEPTEMBAR  24, 2019
पंकज पाटील (उपसंपादक)
 
  • माजी आमदार साहेबराव पाटील व  अडव्होकेट ललिता पाटील यांची ऐनवेळी कार्यक्रमाला पाट
  • विधानपरिषद आमदार यांचा  कार्यक्रम ठिकाणापासून व्यक्तीक कारणामुळे काढता पाय
अमळनेर येथे रोटरी क्लब हॉल मध्ये आज रात्री  ठीक ९ वाजता झी २४ तास  वृत्तवाहिनीच्या दे दणा-दण  कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . तालुक्यातील आजी –माजी सर्व लोकप्रतिनिधीना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते . झी २४ तासच्या टीम कडून तशी कार्यक्रमाची  वेळ व ठिकाण लोकप्रतिनिधी यांना सांगण्यात आली होती .

कार्यक्रम ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार जनतेच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी सर्वात पहिले उपस्थित होते. त्याचवेळी विद्यमान विधान पारिषद आमदार स्मिता ताई देखिल उपस्थित होत्या. विध्यमान आमदार शिरीष दादा यांना कार्यक्रमाला यायला उशीर झाला. तर माजी आमदार साहेबराव पाटील यांना घेण्यासाठी स्वतः झी २४ तासचे प्रतिनिधी गेले असतांना देखिल त्यांनी जनतेच्या प्रश्नाकडे पाठ फिरवत कार्यक्रमाला यायला नकार दिला .कार्यक्रम स्थळी उपस्थित असलेल्या विधान परिषद आमदार देखिल काही अपरिहार्य कारणास्तव कार्यक्रमाला पाट दाखवत निघून गेल्या.

कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अनिल भाईदास पाटील , विद्यमान आमदार शिरीष दादा,कॉग्रेस पक्षाचे गोकुळ पाटील ,एम आय.एम उमेदवार  व बहुजन आघाडीचे प्रतिनिधी हजर होते .तालुक्यातील जनतेच्या मनात असलेल्या पाडळसरे धरणाच्या प्रश्नावरून  अनिल भाईदास  पाटील यानी   विद्यमान आमदार यांना धारेवर धरत  .. विद्यमान आमदार यांनी पाडळसरे धरणाचे स्वप्न पूर्ण करू व शेतीला पाणी व हाताला काम देवून अमळनेर तालुक्याचा विकास करू असे खोटे आश्वासन अमळनेरच्या जनतेला दिले . निवडून आल्यानंतर त्याच पाढळसरे धरणाला चौधरी बंधू यांनी  पांढरा हत्ती म्हणत धरणाकडे पाठ फिरवत अमळनेरच्या जनतेची दिशाभूल व फसवणूक केली यावेळेस जनता त्यांच्या भूल थापणा बळी पडणार नाही .  
 पीकविमा , बोंड अळी  व कर्ज माफी बाबत झालेल्या अपयशा बाबत  कॉग्रेसचे गोकुळ बोरसे  यांनी आमदार साहेबांना निरुत्तर केले.जळगाव जिल्हात जलसंपदा मंत्री असतांना देखिल पाडळसरे धरणाच्या कामाला गती मिळाली नाही हे सत्ताधारी आमदारांचे अपयश असल्याचे अनिल भाईदास  पाटील यांनी सांगितले .एम आय एम चे उमेदवार  यांनी विद्यमान आमदार तालुक्यात रोजगार निर्मिती करण्यात अपयशी ठरले आहेत व त्यांनी अमळनेरच्या जनतेची दिशाभूल केली आहे 


अमळनेर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आजी – माजी लोकप्रतिनिधी यांनी प्रसिद्धी माध्यमांना टाळत जनतेच्या प्रश्नांना पाठ दाखवली . जनता जनार्धन या तालुक्यात मतदान करते तेव्हा लोकप्रतिनिधी यांना  जनतेच्या  सेवेची संधी आमदारकीच्या माध्यमातून मिळत असते .येणाऱ्या विधानसभेत मतदार राजा बनून भावनिक न होता तालुक्याच्या सर्वांगीण विकास करण्याचे ध्येय असलेल्या व पाडळसरे धरणाचा अभ्यास असलेल्या लोकप्रतिनिधीलाच संधी दिली जाईल असा कल कार्यक्रमात उपस्थित असलेल्या जनतेतून  दिसून आला.




भ्रष्ट्राचाराचे दंगल कुरण


राजकारण ...राजकारण !

चला बोलू थोडे

कसे रंगविले कागदी घोडे !

स्टेजवर फेकले फक्त ,

आश्वासनांची फुले ,

दे दना दन !

ऐकू पाहू रणसंग्राम

निवडणुकीच्या यादीतल दमदार नाम

फुंकले गेले निवडणुकीचे रणसंग्राम ,

दे दना दन !

नेता अभिनेता ,

सेवानिवृत्त ,हवसे ,नवसे

उभे राहतील आता ,

खोट्या-लबाड

मारतील बाता ,

त्याला मतदान करू आपण ?

दे दना दन !

जो सोडवेल आता

कोडे पाडळसरे धरणाचे

आपल मत त्याच उमेदवाराला ,

मतदारांच तेच काम

रणसंग्राम ..रणसंग्राम ,

दे दना दन !

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध