Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २४ सप्टेंबर, २०१९

जळगाव जिल्हा पोलीस पाटील संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी प्रविण गोसावी यांची सर्वानुमते निवड




पंकज पाटील (उपसंपादक)
BY ऑनलाईन तरुण गर्जना
SEPTEMBAR  24, 2019

  • अमळनेर तालुक्यात पोलिस पाटील यांचे  समाज कार्याने पोलिस प्रशासनाला मदत.           
जळगाव जिल्हा गाव कामगार पोलिस पाटील संघटनेचेची जिल्हा बैठक जिल्हाध्यक्ष नरेंद्र शिंदे पाटील,खान्देश अध्यक्ष ज्ञानेश्वरजी महाजन साहेब  व जिल्हा सचिव लांडगे ,जिल्हा कार्यकारी अध्यक्ष   विलासराव आबा व संपूर्ण  जळगाव जिल्हापदाधिकारी यांचे सुचनेनुसार जळगाव येथे सरदार वल्लभभाई  पटेल हॉल मध्ये आयोजित केली होती.या बैठकीत पोलिस पाटील संघटनेची अडी अडचणी व भावी काळात संघटनेची वाटचालीसाठी पुढील दिशा कशी असावी याबद्दल चर्चा करण्यात आली . पोलिस पाटलांचे अधिकार आणि कर्तव्य या बाबत चर्चा केली वरील विषयांवर विचार विनीमयातुन चर्चा करून पोलिस पाटलांना मार्गदर्शन करण्यात करण्यात आले.जिल्हा बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
 जिल्हा बैठकीत उत्कृष्ट कामगिरी करणारे  पोलिस पाटीलांचा सत्कार करण्यात आला. व  सदरच्या कार्यक्रमात जळगाव जिल्हा पोलिस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष  नरेंद्र शिंदे पाटील यांचे सुचनेनुसार जळगांव जिल्हा कार्यकारी अध्यक्ष विलास आबांनी जळगांव जिल्हा  उपाध्यक्ष पदी  प्रविण गोसावी पोलिस पाटील नगांव तालुका अमळनेर यांची जिल्हाउपाध्यक्ष पदी निवड करण्याची घोषणा केली .

संघटनेच्या माध्यमातून तालुक्यात प्रशासनाला समाज कार्यात  मदत करण्यात आली –

  • अमळनेर संत सखाराम महाराज यात्रोत्सवात पालखी व रथ मध्ये बंदोबस्त साठी संघटनेचे ५५ पोलिस पावलांच्या मदतीने प्रशासनास मदत केली
  • गणपती व नवरात्रोत्सावात पूर्ण वेळ पोलिस ५५ पाटीलांच्या मदतीने विसर्जन मिरवनुकित पोलिस प्रशासनास मदत
  • संत सखाराम महाराज वाडीसंस्थान च्या २०१द्विशताब्दी सोहळ्यात बंदोबस्त केला
  • लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत अमळनेर विधानसभेच्या ३०० बुथावर १८७ पोलिस पाटलांची अतिशय नियोजनबध्द आणि चांगले कर्तव्य संघटनेच्या वतीने प्रशासनास सहकार्य केले
  • संघटनेतील होतकरू पोलिस पाटलांची मदत घेऊन एक  गाव एक गणपती संकल्पना ४२ गावांमध्ये विनाबंदोबस्त  राबवली
  • या सर्व  चांगल्या कामाची दखल घेत Ad SP Prashantji Bachhav साहेबांनी पोलीस पाटलांना शिटी आणि काठी वाटप केली.
  • लोकसभेच्या निवडणुकीत केलेल्या कामाची उपविभागीय अधिकारी मा.सिमा आहिरे & मा तहसीलदार सौ ज्योती देवरे यांच्या हातून महाराष्ट्रातुन सर्वप्रथम निवडणुक भत्ता आणि प्रशस्ती पत्रक देऊन कौतुक केले अशि अनेक कामे संघटने केलेली आहेत

कार्यक्रमाच्या ठिकाणी संघटनेचे अध्यक्ष ,कार्यकारी अध्यक्ष ,व जिल्ह्यातील पोलिस पाटील उपस्थित होते .

 
 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध