Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २ सप्टेंबर, २०१९
योगेशने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली...
शिरपूर प्रतिनिधी :शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील मराठे गल्लीत राहणारा २९ वर्षीय तरुणाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्याचे कारण मात्र समजू शकलेले नाही.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक १ रोजी दुपारी बारा ते एक वाजेच्या दरम्यान मराठे गल्लीतील योगेश आनंदा मराठे वय २९ याने आपल्या राहत्या घरात दुसऱ्या मजल्यावर गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी त्यांची पत्नी घरात एकटी होती. ती त्याच्यासाठी जेवणाचं ताट करत होती. त्याच्या पत्नीस गॅलरीत आवाज आल्यामुळे तिने लगेच त्या ठिकाणी धाव घेतली. गल्लीतील तरुणांनी त्यास लगेच जमिनीवर उतरवले. गल्लीतील तरुणाने त्यास तात्काळ शिरपूर येथील
रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यास म्रुत घोषित केले. योगेशचे आई-वडील कालच सुरत येथे मोठ्या भावाकडे गेलेले होते. त्यामुळे घरात तो आणि त्याची पत्नी दोघे एकटेच होते. त्याने आत्महत्या का केली यावर काही समजू शकले नाही. त्याच्या पश्चात पत्नी आई वडील भाऊ वहिनी बहीण असा परिवार आहे. त्याच्यावर २ रोजी सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे .तो आनंदा बारकू मराठे यांच्या चिरंजीव आहे. तो मोल मजुरीचे काम करायचा.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा