Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, १ सप्टेंबर, २०१९

शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथील रासायनिक कंपनीत झालेल्या स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाला, तर 50 जखमी






शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथील रासायनिक कंपनीत झालेल्या स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाला, तर 50 जखमी आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्री श्री. गिरीशजी महाजन, अन्न व औषध प्रशासन, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल आज सकाळी धुळे जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यांनी घटनास्थळाला भेट देवून पाहणी केली.  जिल्हाधिकारी गंगाथरण डी., पोलिस अधीक्षक विश्वास पांढरे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, तुषार रंधे, डॉ. जितेंद्र ठाकूर, तालुकाध्यक्ष राहुल रंधे, शहराध्यक्ष हेमंत पाटील, मनोज महाजन, अपर पोलिस अधीक्षक डॉ. राजू भुजबळ, उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, तहसीलदार चंद्रशेखर देशमुख, सुदाम महाजन आदी उपस्थित होते.
मंत्री. श्री. महाजन यांनी सांगितले, या स्फोटाची चौकशी करण्यात येईल. 

दुर्घटनेच्या चौकशीसाठी फॉरेन्सिक तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे जवानांमार्फत सुरू झाले आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. तसेच जखमींना 50 हजार रुपयांपर्यंतची मदत केली जाईल. तसेच जखमींच्या औषधोपचाराचा खर्च शासनामार्फत करयण्यात येईल.

आपल्या वाघाडी गावाजवळील केमिकल कंपणीत खूपच दुःखद घटना घडली. यात कोणतीही चूक नसतांना नाहक निष्पाप गोरगरीब लोकांचे बळी गेले, तर अनेक जखमी झाले. अशी दुर्दैवी घटना पुन्हा न घडो ही देवा चरणी प्रार्थना.

धुळे येथे सिव्हील हॉस्पिटलमध्ये यातील जास्त जखमींवर उपचार करण्यासाठी माझ्या सोबत धुळ्यातील सर्व डॉक्टरांनी उपचार सुरू केले. यातील काहींना माझ्या सिद्धेश्वर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांची मोफत उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. 
शिरपूर येथे कॉटेज हॉस्पिटलमध्ये शिरपूर शहरातील सर्वच डॉक्टरांनी जखमींवर उपचार केले. 
एसडीआरएफ चे जवान, फायरब्रिगेड,पोलीस, प्रशासनाचे अधिकारी, मोठया संख्येने तरुणांनी व अनेक ज्ञात अज्ञात हातांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रुग्णांना हॉस्पिटलमध्ये आणण्यासाठी मेहनत घेतल्यामुळे अनेकांचे प्राण वाचले.
 अजूनही जखमींना आवश्यकता भासल्यास वैद्यकीय मदतीसाठी माझ्याशी त्वरीत सम्पर्क करा. Shirpur

डॉ जितेंद्र ठाकूर
 8888873803

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध