Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १५ सप्टेंबर, २०१९
पंकज इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये पालक सभा संपन्न
चोपडडा :प्रतिनिविनोदनिकम
पंकज इंग्लिश मिडीयम स्कूल चोपडा तर्फे पालक सभेचे आयोजन करण्यात आले, मुख्याध्यापिका व पालक प्रतिनिधी उपस्थित होते
सभेत शाळेतील विद्यार्थ्यांनी Rhymes, poems, sense organs ,Months of the year, Days of the week, यांचे डेमो सादरीकरण केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी या वर्षातील उपक्रमांची माहिती व अत्याधुनिक स्मार्ट शिक्षणासाठी सुरू असलेल्या कृती संबधी सविस्तर माहिती पालकांना सौ मुख्याध्यापिका निता पाटील यांनी दिली.बालकांना प्रत्यक्ष अनुभवातून उत्तम शिक्षण ही आमची संकल्पना असून त्यासाठी अत्याधुनिक साधनांचा वापर शाळेतील शिक्षिका करतात असे सांगितले सोबतच बालमनावर कायमस्वरूपी टिकणारे संस्कार घडविण्याचे उपक्रम विशेष आवर्जून राबविण्यात येतात असे सांगितले, एकूणच संस्कारा सोबत स्मार्ट शिक्षण व बालकांचा विकास विविध ऍक्टिव्हिटी सादरीकरण मध्ये पालकांना दिसून आले. पालक प्रतिनिधी श्री.अतुल पवार यांनी बालकांच्या विकासासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले व पालकांना मार्गदर्शन व विद्यालयातील सर्व उपक्रमास सहकार्या बद्दल आभार मानले.
पालक सभा यशस्वी होण्यासाठी भावना भाट, अनिता पाटील, जोत्सना निकुंभे, तस्निम शेख, शितल भावसार, अनामिका ननावरे,गणेश साळुंखे, बाळू पाटील, सुलभा पाटील, रेखा पवार यांनी परिश्रम केले सूत्रसंचालन सारिका पवार यांनी केले व उपस्थितांचे आभार अश्विनी सावंत यांनी मानले सभेस पालकांची उपस्थिती उल्लेखनीय होती.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा