Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १५ सप्टेंबर, २०१९
नळदुर्ग शहरात पर्युषण पर्व मोठ्या भक्ती भावात संपन्न
प्रतिनिधी विशाल डुकरे:दिगंबर जैन समाजाच्या वतीने शुक्रवारी जैन गल्लीतील भगवान अदिनाथ मंदिर पासून जिनवाणी शास्त्राची पालखी मिरवणुक काढण्यात आली. या पालखी मिरवणुकीतुन जगा आणि जगुद्या असा संदेश देण्यात आला व पर्युषण पर्वाची सांगता या पालखी मिरवणुकीने करण्यात आली. या वर्षी 3 सप्टेंबर पासुन ते 12 सप्टेंबर पर्यंत जैन मंदिरात पर्युषण पर्व संपन्न झाले. या काळात पूजा, अभिषेक, आरती व प्रवचन असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते तसेच या पर्व दरम्यान नळदुर्ग मधील जैन श्राविका सौ. सुविधा सचीन कासार आणि सौ. सुनिता बाहुबली पाटील यांनी सलग पाच दिवस निरंकार उपवास केले.
सोमवारी शहरातून जिनवाणी शास्त्राची पालकी मिरवणूक काढून या पर्वाची सांगता करण्यात आली. मिरवणुकीमध्ये समाजातील युवक, युवती, महिला, पुरुष, लहान मुले सहभागी झाली होती. या वेळी वर्षभरात कळत-नकळत झालेल्या चुकांन बद्दल परस्परांची क्षमा मागून क्षमापना दिन साजरा करण्यात आला.
हा सण साजरा करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे आत्म्याची शुद्धी करून योग्य उपक्रमांवर लक्ष केंद्रीत करणे हा आहे. पर्यावरणाप्रती आत्मा तटस्थ केल्याशिवाय शुद्धी होत नाही. यासाठी 'कल्पसूत्र' या तत्वार्थ सूत्राचे वाचन आणि विवेचन यामध्ये केले जाते. संत-मुनी आणि विद्वानांच्या सानिध्यात स्वाध्याय केला जातो. पूजा-अर्चना, आरती, त्याग, तपस्या आणि उपवास करून अधिकाधिक वेळ संताच्या सानिध्यात घालविला जातो. शिवाय आपल्या दैनंदिन कामकाजापासून दूर राहण्याचा प्रयत्न या दरम्यान केला जातो. संयम आणि विवेकाचा अभ्यास या पर्वात केला जातो.
असा हा पर्युषण पर्व नळदुर्ग शहरा मध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आलं...
या वेळी नळदुर्ग शहरातील जैन युवा मंच, युवक मंडळ व महिला मंडळाने सहभाग नोंदवला...
अशी माहिती जैन युवा मंच अध्यक्ष सुरज आवटे यांनी दिली... या वेळी जैन युवा मंच उपाध्यक्ष- प्रतीक पाटील, सरचिटणीस- अक्षय आवटे, कोषअध्यक्ष- सुमित पाटील, प्रमुख कार्यकारणी सदस्य अजित पाटील व मयुर पाटील, सहसचिव- सुमित यादगिरे, सदस्य:- सुरज पाटील, अमित पाटील, केवल पाटील, अभिषक आवटे, अक्षत आवटे, दिपक कासार, अभिजित पाटील आदी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा