Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ५ सप्टेंबर, २०१९
Home
/
Unlabelled
/
लासुर गावात राष्ट्रवादीचा झंझावात अरुणभाई,जगदीशभाऊ आगे बढ़ो च्या घोषणात वाजत-गाजत रा.यू.कॉ. शाखांचे दिमाखात उद्घाटन
लासुर गावात राष्ट्रवादीचा झंझावात अरुणभाई,जगदीशभाऊ आगे बढ़ो च्या घोषणात वाजत-गाजत रा.यू.कॉ. शाखांचे दिमाखात उद्घाटन
चोपडा(प्रतिनिधी) विनोद निकम तालुक्यातील लासुर गावात दिनांक 4 रोजी सायंकाळी 5 वाजता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष्याच्या वतीने राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शाखा उद्घाटनाचा कार्यक्रम मोठ्या दिमाखात व वाजत गाजत करण्यात आला.चोपडा तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार जगदीशभाऊ वळवी यांच्या सौजन्याने नियोजित या कार्यक्रमात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालूका अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी उत्कृष्ठ नियोजन करीत साऱ्यांची मने जिंकलित या शाखा उद्घाटनाला महाराष्ट्र विधान सभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांची खास उपस्थिती होती .यावेळी गावभर वाजत-गाजत मिरवणूक काढत गावातील बौद्धवाडा,खाटीकवाडा, सावता माळी चौक,वाघ वाडा, पंप नगर या भागातील पाच शाखांचे उद्घाटन अनुक्रमे आदरणीय अरूणभाई गुजराथी,माजी आमदार जगदीशभाऊ वळवी, चो सा का माजी चेअरमन घनशाम अण्णा पाटील,पीपल्स बैंक चेअरमन चंद्रहासभाई गुजराथी,चोपडा न प चे सत्ताधारी गटाचे गटनेते जीवनभाऊ चौधरी,माजी उपनगराध्यक्ष राजुभाऊ देशमुख,यांच्या हस्ते करण्यात आले .या वेळी लासुर गावात राष्ट्रवादीमय वातावरण निर्मिति झाली गावातील तरुण,अबालवृद्ध, महिला भगिणी यांनी अरुनभाई गुजराथी,जगदीशभाऊ तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है,राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा विजय असो,शरद पवार साहेब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है अश्या घोषणा देत पाठिंबा दाखविला या शाखा उद्घाटन प्रसंगी लासुर गावातील ग्रामस्थ सुभाष वाघ अनिल वाघ,रसु माळी, नरेंद्र महाजन,हिम्मतराव महाजन,आर के पाटील, शंकर महाजन,चंद्रकांत पाटील आर एन पवार, भास्कर पाटील,नोमीन पटोलिया,कल्याण पाटील, गोकुळ महाजन,चंद्रकांत वाघ,जावरे साहेब सोमनाथ सोनार,जिजाबराव पाटील, दिनकर पवार, श्रावण बाविस्कर,शांताराम सोनवणे,जगदीश मगरे, संजय कुंभार संजय विसावे,हर्षल वाघ,तुषार पाटील, मुकेश पाटील,अकिलखा पठाण, शरीफ ठोके,मोहसिन पठाण, सुभाष पावरा,बूधा पावरा,मांगली बारेला,हीरालाल बारेला अनिल बारेला,राजेन्द्र महाजन,साहेबराव महाजन यांच्या सह शेकडो कार्यकर्ते हजर होते लासुर गावात या कार्यक्रमा निमित्ताने एक प्रकारे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शक्ती प्रदर्शन करण्यात आले आणि गावात शक्तिप्रदर्शनाला साथ मिळाली
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा