भावडी(ता.आंबेगाव):प्रतिनिधी:निखिल राजपूत:कृषी कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत भावडी येथे कृषी दुत आकाश मांडे, मयुर दाणे, अनिकेत रहाणे, अवधूत धुमाळ, सौरभ वाघमाळे, धनंजय बारवकर यांनी डाळिंब पिकाच्या खत व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना माती परीक्षण केलेल्या डाळिंब पिकात नत्र, स्फुरद व पालाश किती व कोणत्या प्रमाणात द्यावे आणि त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या एकल खतांची मात्रा कशी असावी याविषयी माहिती सांगितली.
5 वर्षानंतर झाडाच्या वाढीनुसार प्रत्येक झाडास 10 ते 50 किलो शेणखत आणि 625 ग्रॅम नत्र 250 ग्रॅम स्फूरद व 250 ग्रॅम पालाश दरवर्षी द्यावे. अनियमित खतांची मात्रा दिल्याने फळांच्या वाढीवर परिणाम होतो , तसेच उत्पादनात घट येते. यावेळी शेतकरी रामभाऊ गोरड, बाळासाहेब नवले, राम काळे, केतन शिंदे आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा