Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, २२ सप्टेंबर, २०१९

तापी पतपेढी भ्रष्टाचार प्रकरणी लेखापरीक्षक व कर्जदार यांना चार दिवसाची कोठडी




डॉ.सुरेश बोरोले ,पंकज बोरोले यांचा अटकपूर्व जामीनावर उद्या होणार सुनावणी




चोपडा प्रतिनिधी विनोद निकम: तापी सहकारी पतपेढी मधील भ्रष्टाचार प्रकरणी लेखापरीक्षकाला  कोठडी मिळाली असून पंकज बोरोले व सुरेश बोरोले यांचा अटकपूर्व जामिनावर अमळनेर येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात सोमवारी सुनावणी होईल तापी सहकारी पतपेढी मधील कथित ४४कोटीचा अपहार प्रकरणी बेकायदेशीर कर्जदार आणि अंतर्गत लेखापरीक्षण त्याला राज्य गुन्हा अन्वेषण विभागाने अटक करून शुक्रवारी दिनांक २० रोजी सायंकाळी अमळनेर न्यायालयात हजर केले होते यावेळी न्यायाधीश राजीव पांडे यांनी त्यांना चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

तापी सहकारी पतपेढी असून सुमारे ४४ कोटींचे बेकायदेशीर कर्ज काढून ठेवीदार व इतर सभासदांची फसवणूक केली म्हणून सुरेश बोरोले व पंकज बोरोले यांच्यासह २५ जणांविरुद्ध पासून फसवणूक आणि बनावट कागदपत्र तयार केल्याचा गुन्हा २०११ मध्ये चोपडा पोलिस ठाण्यात दाखल आहे त्यात सुरेश बोरोले,पंकज बोरोले, विश्वनाथ याद्निक यांचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे अंतर्गत लेखा परीक्षक नागसेन तुकाराम कांबळे (रा. अंबरनाथ, ठाणे) यांनी खोट्या कर्जदार खोट्या कर्ज जाणीवपूर्वक मदत केली व मर्यादेपेक्षा अधिक ४४ कोटी ८५लाख रुपये बेकायदेशीर कर्ज घेणारे प्रणय देविदास विसपुते(रा.सिंहगड,पुणे)यांना राज्य गुन्हे अन्वेषण नासिक विभागाचे उपअधीक्षक बी. डी.कोळी यांनी अटक केली आहे व विसपुते यांना २० सप्टेंबरला अंमळनेर येथील जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले.येथे सरकारी वकील किशोर बागुल यांनी युक्तिवाद केला त्यानंतर आरोपींना 24 सप्टेंबर पर्यंत चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावली यानंतर आरोपींना चोपडा पोलिस स्टेशनला नेण्यात आले तर सुरेश बोरोले व पंकज बोरोले यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी अमळनेर येथील अतिरीक्त जिल्हा सत्र न्यायालयात होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध