शिरपूर : (प्रतिनिधी)- शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथील रुमित केमसिंथ प्रा.लि. या केमिकल फॅक्टरीतील अपघातामधील मृतांच्या नातेवाईकांना शिरपूर येथील श्री.छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळ, हूलेसिंग नगर, करवंद नाका शिरपूर यांच्यातर्फे ३० हजार रुपयांची रोख रक्कम स्वरुपात मदत केली. हुलेसिंग नगरच्या युवा कार्यकर्त्यांनी घटनास्थळी माहिती घेवून कॉलनी रहिवाश्यांना सांगितले व सर्वांनी एकमताने निर्णय घेवून यावर्षी गणपती बसवायचा पण कुठल्याही प्रकारचा गाजावाजा न करता उर्वरीत संपूर्ण रक्कम वाघाडी येथील अत्यंत गरजू लोकांना देण्यात यावी. सदर रक्कम दुर्घटनेतील मयत नितीन संतोष कोळी व मनोज सजन कोळी या दोघांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १५-१५ हजार रुपयांची मदत त्यांच्या वाघाडी येथील घरी जावून रोख रक्कम स्वरुपात देण्यात आली. यावेळी मयतांच्या नातेवाईकांनी हलेसिंग नगर वासियांचे आभार व्यक्त मानले.
यावेळी वाघाडीचे भैय्या कोळी सर, प्रा.शाम पाटील सर , सावळे सर, दिनेश पाटील सर, मराठे नाना, चंद्रकांत पाटील, डॉ.नितीन निकम सर, पुरुषोत्तम पवार, हुलेसिंग नगरचे पदाधिकारी नवनीत पुरी, उदय पाटील, प्रतिक पाटील, ज्ञानेश्वर धोबी, भुवन निकम, मोनू सोनार, बबलू पाटील, दिनेश राठोड आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा