Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २१ सप्टेंबर, २०१९

पैलाड येथील भोई समाज मंगल कार्यालयाचे थाटात भूमिपूजन, धोबी समाज मंगलकार्यालयाचे भूमिपूजन आमदार शिरीष चौधरी यांच्या प्रयत्नांनी होणार स्वप्नपूर्ती.






पैलाड येथील भोई समाज मंगल कार्यालयाचे थाटात भूमिपूजन 




धोबी समाज मंगलकार्यालायचेही भूमिपूजन, आमदार शिरिष चौधरी यांच्या प्रयत्नांनी होणार स्वप्नपूर्ती

अमळनेर प्रतिनिधी शहरातील पैलाड भागात आ.शिरीष चौधरींच्या प्रयत्नातून 20 लक्ष निधीतून भव्य भोई समाज मंगल कार्यालयाचे निर्माण होणार असून याचे भूमिपूजन नुकतेच आ.चौधरींच्या शुभहस्ते तर हिरा उद्योग समूहाचे चेअरमन डॉ रवींद्र चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.तर याच भागात धोबी समाज मंगल कार्यालयाचेही भूमिपूजन करण्यात आले.
पैलाड भागात भोई समाजाचे नवीन मंगल कार्यालय व्हावे हे समाज बांधवांचे स्वप्न असताना आ.चौधरींनी 20 लाख  निधी आमदार निधीतून मंजूर केल्याने हे समाज कार्यालय निर्माण होणार आहे होणार आहे.याप्रसंगी आयोजित सोहळ्यात आमदार चौधरी यांनी बोलताना सांगितले की गाव तेथे काम मी केलेले असून जलयुक्त शिवार तसेज बेरोजगारी प्रश्न ही काही प्रमाणात सोडलेला आहे,प्रत्येक समाजास परिपूर्ण न्याय देणे हीच आपली भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले  यावेळी डॉ रवींद्र चौधरी आरिफ भाया सुभाष चौधरी यांचीही भाषणे झालीत,सुरवातिला फरशी पूल ते भोई वाडा पर्यंत आमदारांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली,तसेच कार्यक्रमात पक्षीमित्र म्हणून अंबरीश टेकडीवर उल्लेखनीय काम करणारे सुनिल भोई आणि रक्तदानाची महान चळवळ चालविणारे मनोज शिंगाने यांचा विशेष सत्कार आमदारांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष प्रभाकर पाटील,महावीर पतपेढीचे चेअरमन प्रकाश पारख,  नगरसेवक सुरेश पाटील, संजय कौतिक पाटील, भाऊसाहेब महाजन, संजय भिल, ज्योती भोई, माजी उपनगराध्यक्ष अनिल महाजन,पंकज चौधरी बाळासाहेब संदानशिव, किरण बागुल ,साखरलाल महाजन, सलीम टोपी ,संतोष लोहिरे ,सुदारपट्टीचे सरपंच सुरेश पाटील, किरण  गोसावी, गोपाळ पहेलवान,  किशोर पहेलवान,बाळू पाटील,भिला पाटील इ मान्यवर उपस्थित होते सर्व मान्यवरांचा सत्कार समाजातील जेष्ठ लोकांचा हस्ते करणयात आला. सुत्रसंचलन सुनिल भोई यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व  भोई समाज बांधवांनी परिश्रम घेतले.

धोबी समाजालाही दिला न्याय

पैलाड भागातच धोबी समाज मंगल कार्यालयचे भूमिपूजन आमदार शिरीष चौधरींच्या हस्ते करण्यात आले,यावेळी सर्व धोंबी समाज पंच मंडळ तसेच सर्व समाज बांधव आणि महिला पुरुष उपस्थित होते,याव्यतिरिक्त मातंग वाडा येथे आण्णा भाऊ साठे स्मारकाचे उदघाटन देखील यावेळी कऱण्यात आले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध