Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
रविवार, २२ सप्टेंबर, २०१९
रावेर तालुक्यातील चिनावल येथे शेतकरी मेळावा संपन्न. ..
प्रतिनिधी अजीज शेख सी.एम.व्ही.व्हायरस नियंत्रणासाठी पिक फेरपालट आवश्यक करावे असे
डॉ.एच.त्रिपाठी यांनी सुचविले तसेच सद्यस्थितीत केळी पट्ट्यातील विशेष करून रावेर तालुक्यात केळीवर सी एम व्ही व्हायरस ( हरण्या ) रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असून यामुळे उत्पादक धस्तावले आहे मात्र उत्पादकांनी आपली पारंपरिक केळीवर केळी लागवड, दरवर्षी माती परीक्षण व जमीनीला आवश्यक घटक तसेच ठराविक तापमानात उती पासुन निर्मित निर्जंतुक बेणे ची निवड केल्यास यावर नियंत्रण शक्य असल्याचे भारतीय किसान अनुसंधान संस्थान ( I C A R ) चे कुषी संशोधक डॉ.एच.त्रिपाठी यांनी आज चिनावल येथे केळी उत्पादकांच्या शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करताना आज चिनावल येथे डॉ.उल्हास पाटील कुषी महाविद्यालय विद्यापीठाच्या मार्फत शेतकरी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ एस एम पाटील हे होते
याच वेळी आय.सी.ए.आर.ची टीम ही चिनावल व परिसरात सद्यस्थितीत केळी बागांवर मोठ्या प्रमाणात आलेल्या सी.एम.व्ही व्हायरस संदर्भात प्रत्यक्ष केळी बागांची पाहणी व उत्पादकांना मार्गदर्शन करीत असताना आ.हरिभाऊ जावळे व महाराष्ट्र कुषी विभागाला मेळाव्याची माहिती मिळताच या ठिकाणी या कुषी सशोधकासह कुषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी येवून शेतकऱ्यांना येथे सविस्तर मार्गदर्शन करता येईल या उद्देशाने येथे येऊन उत्कृष्ट असे मार्गदर्शन केले
यावेळी डॉ त्रिपाठी यांनी एकाच शेतात वारंवार केळीची लागवड व केळी बेणे निवडताना निरोगी कंद किंवा उतीसवधक रोपे घेतांना कोणत्याही प्रकारचा त्यात व्हायरस नसल्याची खात्री असेल तरच घ्या, मातीच्या परिक्षण नुसार जमिनीला द्यावयाचे अन्नघटक तसेच केळीत आतरपिकामुळे होणाऱ्या मावा किड यांचे योग्य नियंत्रण व योग्य काळजी घेतल्यास हा व्हायरस नियंत्रण होवू शकतो असे प्रतिपादन केले सदर वेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुषी संशोधक डॉ.एस.व्ही.सुपे, डॉ.राज वर्मा.जैन चे केळी संशोधक डॉ के.बी.पाटील डॉ.शेख यांनीही ही.एम.व्ही.व्हायरस नियंत्रणासाठी घ्यावयाची काळजी बाबत मार्गदर्शन केले तर कुषी तज्ञ वसंतराव महाजन यांनी ही माहिती दिली
यावेळी आ.जावळे हेही उपस्थित होते व्यासपिठावर चिनावल च्या सरपंच सौ भावना बोरोले,चिनावल फार्मर्स कंपनीचे अध्यक्ष गोपाळ पाटील कुंभारखेडयाचे शेतकरी प्रदिप पाटील, उपसरपंच पुनित पाटील, शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते विलास ताठे , योगेश पाटील ,प्रविण बोंडे, तनुजा सरोदे हे उपस्थित होते
यावेळी एकात्मिक किड नियंत्रण संदर्भात डॉ उल्हास पाटील कुषी महाविद्यालय विद्यापीठ च्या कुषीदूत अभिषेक पाटील व दिक्षा महाले यांनी मार्गदर्शन केले सदर वेळी प्रा.अनिल फापळे यांचे मार्गदर्शन लाभले.तर हेमांगी सपकाळे व भूषण वाघ यांनी सूत्रसंचालन केले तसेच प्रशांत ठाकरे ,अक्षय सुपले , विठ्ठल ताले , प्रदीप गीते, मयूर फुसे, प्रतिक देशमुख यानीं कार्यक्रमाचे उत्तम रित्या नियोजन केले सदर मेळाव्याला श्रीमंत योगी कुषी विज्ञान मंडळाचे अध्यक्ष
विलास ताठे, विश्वनाथ पाटील, सुहास सरोदे, यांनी तसेच डॉ उल्हास पाटील कुषी महाविद्यालय
विद्यापीठाच्या कुषीदूत कुषीकन्यानी परिश्रम घेतले.
तर कुंभारखेडा. उटखेडा, सावखेडा.भाटखेडा , वडगाव, चिनावल सह परिसरातील केळी उत्पादक शेतकरी मोठय़ा प्रमाणावर उपस्थित होते. .
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रेयसीला शेवटचा व्हिडीओ कॉल -बनावट नावाने लॉज मध्ये राहिला अमळनेर : गुजरात मधील अहमदाबाद मधील पोस्को चा गुन्हा दाखल असलेल्या एका आरो...
-
अमळनेर : तालुक्यातील जवखेडा येथे मंगळवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास वीज चमकल्याने घोड्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. सायंकाळी अ...
-
मोटरसायकल वर दूध वाहून नेणाऱ्या जानव्याच्या भाग्यश्रीचे अपघाती निधन अमळनेर : वडिलांच्या व्यवसायात हातभार लावून पित्यासाठी ‛भाग्यश्री’ ठर...
-
अमळनेर : भुसावळ सुरत पॅसेंजर मध्ये अवघ्या एक महिन्याच्या बाळाला टाकून आई वडील अमळनेर स्थानकावर उतरून गेल्याची घटना ९ रोजी रात्री घडली. ...
-
शिरपूर प्रतिनिधी : परिस्थिती सोबत संघर्ष करीत पत्रकार गणेश जैनांनी पाहिलेले स्वप्न त्यांची लेक तनिष्का जैन हिने दहावीच्या गुणवत्ता यादीत यत...
-
शिरपूर प्रतिनिधी : शिरपूर कृषि उत्पन्न बाजार समिती येथून १९ मे २०२५ रोजी सकाळी ८ वाजता सर्वपक्षीय, सर्वधर्मीय, जिल्हास्तरीय तिरंगा यात्रा आय...
-
साक्री तालुक्याचे प्रगतीशील शेतकरी श्री विशाल दिलीप खैरनार.में वाय.जी.मोरे सिड्स अँड पेस्टीसाईड चे संचालक यांच्या मौजे विठाई येथील शेतात कलश...
-
नंदुरबार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नंदुरबार येथून श्री जितेंद्र दामोदर पगारे (सर) नंदुरबार जिल्हा क्रीडा पुरस्कार सन २०२२-२३ पुरस्कार...
-
पारोळ्याच्या फटाका फॅक्टरीच्या तिघा मालकांना दहा वर्षांचा कारावास १६ वर्षांपूर्वी आगीत २१ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अमळनेर सत्...
-
नाशिक प्रतिनिधी :नाशिक गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या डिके नगर पोलीस चौकीत रात्री अकरा वाजेच्या सुमारास ४ ते ५ पोलीस कर्मचारी ओली पार्...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा