Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २० सप्टेंबर, २०१९

भटाणे येथे डॉ जितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते विकासकामाचे उद्घाटन






शिरपूर प्रतिनिधी:भटाणे या गावासाठी पंचवीस पंधरा या ग्राम विकास योजने अंतर्गत मंजूर झालेल्या रस्ता कॉंक्रिटीकरण करणाच्या उदघाटन डॉ जितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा तालुकाध्यक्ष राहुल रंधे उपस्थित होते.

शिरपूर तालुक्यातील भटाणे येथे पंचवीस पंधरा ग्राम विकास योजनेंतर्गत रस्ता काँक्रेटीकरण मंजूर करण्यात आला आहे. ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्याकडे भाजपा जिल्हाध्यक्ष तथा म्हाडा उपसभापती बबनराव चौधरी, भाजपा तालुका प्रभारी डॉ जितेंद्र ठाकूर, तालुकाध्यक्ष राहुल रंधे यांनी पाठपुरावा केला होता.अखेर रस्ता काँक्रेटीकरणासाठी १५ लक्ष रु निधी मंजूर करण्यात आला होता.या रस्त्याचे उदघाटन दि २० रोजी डॉ जितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी राहुल रंधे, भटाणे गावचे पं स सदस्य ब्रिजलाल मोरे, सरपंच मनोहर पाटील, मा सरपंच अविनाश सूर्यवंशी,मा सरपंच दिलीप गिरासे,जगदीश पाटील, चेतन पाटील, दरबार गिरासे, प्रवीण पाटील,महेंद्र राजपूत, धनराज मोरे, नरेंद्र गिरासे,महेंद्र कोळी, दिनेश राजपूत, आदीसह गावकरी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध