Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २० सप्टेंबर, २०१९

नळदुर्ग येथील महाविद्यालयीन विद्यार्थिनींना ड्रेस वाटप






नळदुर्ग:प्रतिनिधी विशाल डुकरे: राज्याचे महसूलमंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नळदुर्ग येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय येथील विद्यार्थिनींना ड्रेसचे वाटप करण्यात आले. आपला वाढदिवस बॅनरबाजी व वायपट खर्च न करता अत्यंत विधायक उपक्रमांनी साजरा व्हावा याहेतूने दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील भागातील विद्यार्थिनींना एक मदत होईल ही भावना जपत नळदुर्ग शहर भाजप व युवा मोर्चा वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी बोलताना मुलींनी आपल्या भावी जीवनात उच्च ध्येय ठेवून मार्गक्रमण करावे.

परिस्थितीची भीती न बाळगता ती बदलत असते हे समोर ठेऊन खचून न जाता समाजाच्या उत्थानासाठी सज्ज व्हावे असे प्रतिपादन प्रदेश कार्यकारणी सदस्य अॅड. अनिल काळे यांनी केले. तसेच तुळजापूर विकास प्राधिकरण सदस्य नागेश (नाना) नाईक, माजी पंचायत समिती सदस्य साहेबराव घुगे, भाजपा शहराध्यक्ष पद्माकर घोडके, जेष्ठ कार्यकर्ते दिलीप कुलकर्णी, युवा मोर्चा शहराध्यक्ष श्रमिक पोतदार, माजी शहराध्यक्ष गोपालकृष्ण देशपांडे, यांची प्रमुख उपस्थिती होती. नळदुर्ग येथील अतिथी मंगल कार्यालयात हा कार्यक्रम घेण्यात आला त्यामध्ये 328 विद्यार्थिनींना ड्रेस देण्यात आला प्रसंगी नागेश नाईक, साहेबराव घुगे यांचे भाषण झाले या कार्यक्रमात उमेश नाईक, मयूर महाबोले, किरण दुस्सा, सुमित यादगिरे, कैलास चव्हाण, रियाज शेख, पुरुषोत्तम बेले, आकाश कुलकर्णी, खंडेशा व्हनाळे, किरण राठोड, सचिन चव्हाण, सुनील चव्हाण, प्रेमदास राठोड, यांच्यासह नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन साहेबराव घुगे, गोपाळ देशपांडे यांनी केले तर आभार श्रमिक पोतदार यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध