Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २० सप्टेंबर, २०१९

नाशिक वासन नगर परिसरातील महिलेच्या गळ्यातील पाच तोळे वजनाची सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना घडली





नाशिक:इंदिरानगर प्रतिनिधी जितेंद्र गिरासे  वासन नगर परिसरातील महिलेच्या गळ्यातील पाच तोळे वजनाची सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी  ओरबाडून नेल्याची घटना घडली 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनिता शेलार (४०) नंदी रेसिडेन्सी फ्लॅट नंबर ७ बडदे नगर   दि(१७) मंगळवार रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास त्यांच्या जेठाण्या सुरेखा व सुनीता असे तिघेही गामणे मळ्या  समोरून पायी चालत जात असताना गामणे  मळ्या कडून एका काळा रंगाच्या दुचाकीवरून दोन अज्ञात इसम त्यांच्या समोरून आले व त्यातील पाठीमागे बसलेल्या इसमाने शेलार यांच्या गळ्यातील एक लाख ३५ हजार रुपये किमतीच 

साडेचार तोळ्याचे मंगळसूत्र ओरबाडून धूम स्टाईल पळ काढला याप्रकरणी  इंदिरानगर पोलीस ठाण्यात जबरी  चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून   वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक राकेश भामरे अधिक  तपास करत आहेत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध