Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १९ सप्टेंबर, २०१९

निंभोरा ते स्टेशन पर्यत रस्ता गेला खड्यात वाहन धारक त्रस्त लोकप्रतिनिधिचे दुरुलक्ष





प्रतिनिधी अजीज शेख रावेर तालुक्यातील निंभोरा 
येथील बसस्टाँप ते स्टेशन च्या रसत्यात मोठे मोठे खड्डे पडले असुन याकडे मात्र लोकप्रतिनिधी सह सबंधिताचे दुलक्ष याकडे होत असल्याचे दिसुन होत असल्याचे दिसुन येत आहे 




येथील स्टँड परीसरातील पाऊस आला की मोठ्या प्रमाणात पाणी साचत असते यामुळे पायी जाणार्या येणार्या तसेच पादचारी तसेच वाहनधारकांना मोठी अडचण होते 
त्याच बरोबर कन्या शाळा जवळ देखील खड्डे झाले आहेत तसेच माहुरकर यांचे दुकानाजवळ भलामोठा खड्डा असल्याने महीला व विद्यार्थाना कसरत करावी लागत आहे चिखलयुक्त घाण पाणि अंगावर उडाल्यामुळे लहान मोठे भांडण तंटे होत आहे किमान स्थानिक जि.प.व प.स.सदस्य ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच लोकप्रतिनीधीनी तो रस्त्यात बुजवावा अशी मागणी ग्रामस्थांनी कडुन होत आहे



निंभोरा सेंट्रल बँकेत सलग चौथ्या दिवशी ही  लिंक बंदच,
कोट्यवधींचे व्यवहार असताना लिंकमुळे ग्राहक हैराण.





प्रतिनिधी अजीज शेख: रावेर तालुक्यातील निंभोरा- येथील
येथील सेंट्रल बँकेत आधीच कमी कर्मचाऱ्यांवर काम चालवत असतांना गेल्या 3 महिन्यात अनेकदा लिंक बंद असल्यामुळे बँक ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. किमान ७०ते ८०कोटींवर व्यवहार असलेल्या या जिल्ह्यातील भक्कम आर्थिक व्यवहार असलेल्या महत्वाचे बँकेत  बीएसएनएल च्या लिंक वर अवलंबून राहावे लागत असून बी एस एनएल ची वारंवार नेट कनेक्टिव्हिटी बंद पडणे ग्राहकांना मनस्ताप देणारी ठरत आहे.गेल्या 3 महिन्यात असे प्रकार वाढत असल्याने या बँकेत नेट व विज व्यवस्था बदलण्याची गरज आहे.अशीच परिस्थिती काल व दि.16 व 17रोजी दुपारी रोकड नसल्याने थांबलेल्या ग्राहकांना अनुभवायला मिळाली.यावेळी गावातील विज वितरण तर्फे काम सुरू असल्याने लाईट बंद होती मात्र दुपारपर्यंत बँकेतील यूपीएस द्वारे काम सुरू असताना यूपीएस ही बंद पडले.मात्र विजव्यवस्था सुरळीत झाल्यावर लेजर बंद पडले.व त्यामुळे व्यवहार होऊ शकले नाही.दुसऱ्या दिवशी दिवसभर नेट बंद असल्याने लिंक बंदमुळे व्यवहार ठप्प राहिले मात्र यामुळे दुरवरुन खेड्यापाड्यातून येणाऱ्या  महीला व म्हाताऱ्या तसेच शालेय विद्यार्थी ग्राहकांना होणाऱ्या त्रासास जबाबदार कोण?? बीएसएनएल,वीजमंडळ,बँक प्रशासन या त्रिकुटातील त्रुटींमुळे मात्र ग्राहक भरडला जात असताना बँक प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.वारंवार नेटची समस्या येत असताना कोट्यवधींचे व्यवहार होणारी सेंट्रल बँक साधे खाजगी कंपनीचे नेट कनेक्शन का ठेवू शकत नाही??असा प्रश्न ग्राहकांना पडला असून एक-दोन कर्मचाऱ्यांवर मोठे कार्यक्षेत्र असलेल्या बँकेने ग्राहकांना वेठीस धरले आहे.त्यातच एका कर्मचाऱ्याला दोन दिवस चोपडा व दोन दिवस शिरसोली आशा पद्धतीने काम देऊन दोनच दिवस निंभोरा बँकेत दिले आहेत त्यामुळे कृषी कर्ज व कार्याची मोठी अडचण या शाखेत येत आहे.यामुळेच या बँकेत एखाद्या दिवशी ग्राहकांचा उद्रेक होईल अशी चिन्हे आहेत.

बँकेत व्होडाफोन कनेक्शन साठी मागणी केली असून वरिष्ठांकडे ती प्रलंबित आहे.आज संध्याकाळी नेट सुरळीत झाले असून उद्या व्यवहार नियमित होतील.
श्री.एस के ओझा,
बँक व्यवस्थापक,
सेंट्रल बँक,निंभोरा.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध