Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, १४ सप्टेंबर, २०१९

करून दान रक्ताचे , ऋण फेडूया समाजाचे – पोलिस निरीक्षक अंबादास मोरे



पंकज पाटील  (उपसंपादक तरुण गर्जना )


रक्तदान हे अनमोल जिवनदान आहे आपले रक्तदान एखाद्या गरजवंताला ,रुग्णाला ,अपघातग्रस्थाना जिवन दान ठरत असते.
करून  दान रक्ताचे ,
 ऋण फेडूया  समाजाचे ..!
हा नारा आपण सर्वांनीच अंगिकारला पाहिजे असे अमळनेरचे पोलिस निरीक्षक अंबादास मोरे यांनी सांगितले व स्वतः गरजू महिलेला रक्तदान केले .
पातोंडा येथील  मनीषा पाटील या महिलेस ‘B+ ‘ रक्ताची आवश्यकता होती .अमळनेर येथील रक्तदानाची चळवळ उभी करणारे मनोज शिंगाने व त्यांच्या गृप कडून सोशल मिड्यावर नेहमीच रक्तदान करण्यासाठी मदत मागितली जाते. त्या निमित्ताने गरजू  लोकांना रक्तदान केले जात असते. त्याच माध्यमातून आपल्या तालुक्याचे कर्तव्यदक्ष पी आय अंबादास मोरे यांनी स्वतः रक्तदान करत समाजात एक नविन आदर्श निर्माण केला आहे.प्रशासकीय अधिकारी या नात्याने समाजात कसे वागले पाहिजे हे त्यांनी यानिमित्ताने दाखवून दिले आहे.
 शिकायचं एक आणि वागायचं वेगळ हे नोकरीतले ब्रीदवाक्य आहे पण ते विधान खोटे ठरवत
 “जे शिकायचं तेच वागायचं “  हे रक्तदानाच्या माध्यमातून पीआय अंबादास मोरे यांनी समाजातील प्रत्येक अधिकाऱ्याला व कर्मचारीला सांगितले आहे .
रक्तदानाचे फायदे -
रक्तदान केल्यानंतर स्वतः पी.आय. अंबादास मोरे यांनी रक्तदानामुळे आपल्या शरीराला कुठलेही नुकसान अथवा हानी होत नसते .आपल्या शरीरात रक्त निर्माण होण्याची प्रक्रिया निरंतर सुरु असते . आपल्या रक्तदानामुळे गरजू व्यक्तीचे प्राण वाचत असल्याने त्यानिमिताने आपण रक्तदान करून जिवन दान देत असतो . जास्तीत –जास्त तरुणानी मनोज शिंगाने व त्यांच्या मित्र परिवाराच्या रक्तदाणाची चळवळ या ग्रुपला सोशल  मिडीयाच्या माध्यमातून दिलेल्या हाकेला प्रतिसाद देत मदत केली पाहिजे  असे प्रसार माध्यमांशी बोलतांना सांगितले.

मनोज शिंगाणे स्वतः रक्तदान करतांना   
अमळनेर तालुक्यात रक्तदानाची चळवळ उभे करणारे मनोज शिंगाणे -
रक्तदान चळवळ राबविणारे मनोज शिंगाणे यांनी   मित्र परिवार यांच्या माध्यमातून अमळनेर तालुक्यात असंख्य गरजू लोकांना रक्तदान केले आहे हे आपल्या सर्वासाठी अत्यंद प्रेरणादायी असून  प्रत्येकाने रक्तदान करण्यासाठी पुढे आले पाहिजे असे आव्हान तरुणांना करण्यात आले आहे.

वृक्ष मित्र पंकज पाटील  स्वतः रक्तदान करतांना   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध