Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १४ सप्टेंबर, २०१९
Home
/
Unlabelled
/
आज शिंदखेडा पंचायत समिती च्या नूतन प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा ना.जयकुमारभाऊ रावल यांच्या हस्ते पार पडला.
आज शिंदखेडा पंचायत समिती च्या नूतन प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा ना.जयकुमारभाऊ रावल यांच्या हस्ते पार पडला.
प्रतिनिधी राहुपाटील: शिंदखेडा पंचायत समितीसाठी 2 कोटी 74 लाखाचा निधी ग्रामविकास विभागाकडून मंजूर झाला होता त्यातून पंचायत समितीच्या मालकीच्या 1 हेक्टर 78 आर क्षेत्रात ही भव्य वास्तू उभी राहिली आहे.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी वानमती सी, गटविकास अधिकारी सुरेश शिवदे, कामराज निकम, अनिल वानखेडे, नरेंद्र गिरासे, सर्जेराव पाटील, विश्वनाथ पाटील, रघुवीर बागल,विक्रम पाटील, तहसीलदार सुदाम महाजन, साहेबराव सोनवणे, माजी सभापती जिजाब राव सोनवणे, नथा पाटील, सहा गटविकास अधिकारी वळवी, उपअभियंता संजय बागुल,
गटशिक्षणाधिकारी एफ के गायकवाड, कार्यलय अधीक्षक विजयसिंह गिरासे, आर के गिरासे, योगेश गिरासे, ठेकेदार यशवंत पाटील,आदी मान्यवर उपस्थित होते
यावेळी बोलताना ना.रावल म्हणले की, शिंदखेडा तालुक्याला पूर्वी कायमस्वरूपी दुष्काळी असा कलंक लागला होता, सतत दुष्काळ पडल्याने कितीही विहिरी खोदल्या बोअरवेल केल्या तरी देखील पाणी लागत नव्हते , आपण पाणी अडविण्यासाठी जलयुक्त शिवार , आणि इतर माध्यमातून बंधारे, नाला खोलीकरण अशी विविध कामे केली होती याशिवाय बुराई नदीवर माथा ते पायथा बंधारे बांधून ठेवलेहोतें,
आज जोरदार असा पाऊस पडल्यानंतर शिंदखेडा तालुक्यातील वाडी शेवाडी प्रकल्प, अमरावती प्रकल्प, तापी वरील बॅरेज असे चहुबाजूंनी पाणीच पाणी असलायने आपला सिचन सह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असून पुढील काळात सुलवाडे जामफळ , आणि प्रकाशा बुराई उपसा योजनेचे काम देखील सुरू असून येत्या 2 ते 3 वर्षात शिंदखेडा मतदारसंघात दुष्काळ हा शब्द देखील निघणार नाही एवढी कामे करून देखील पाऊस नसल्याने आम्हाला चिंता वाटत होती परंतु आमच्या कुलदेवता असलेल्या आशापुरी आणि
पेडकाई मातेच्या मंदिराला देखील आम्ही निधी देऊन चांगल्या पावसासाठी साकडे घातले होते अखेर वरुण राजाने देखील कृपा करून आमच्या तालुक्यातील सर्वच प्रकल्प आणि बंधारे पूर्ण भरल्यामुळे विरोधकांना धडकी भरली असून विकासाच्या मुद्यावर कोणताही मुद्दा आता त्याच्याकडे नाही म्हणून ते जातीय विष पेरून तालुक्याचे वातावरण खराब करतील त्याना तिथेच धडा शिकवावा असे आवाहन करत पुढच्या पिढीला आता दुष्काळ हा शब्द देखील माहिती पडू देणार नाही असे प्रतिपादन त्यांनी शेवटी केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा