शिरपूर (प्रतिनिधी ) तालुक्याचे काँग्रेसचे आमदार काशीराम पावरा,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रभाकर चव्हाण यांनी आज दि.३० सप्टेंबर रोजी मुंबईतील गरवारे क्लब येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात अधिकृत प्रवेश केला.आणि शिरपूर शहरासहित ग्रामीण भागातील काशीराम पावरा व प्रभाकर चव्हाण यांचे समर्थकांनी फटाके फोडून आनंद साजरा केला. मुंबईतील प्रवेश सोहळावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,भाजपा अध्यक्ष चंद्रकांत पाटील,जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शिरपूर तालुक्यातील काँग्रेसचे आ. काशीराम पावरा आणि काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रभाकर चव्हाण यांनी आपल्या भाजपा पक्षात अधिकृतपणे प्रवेश केला असून लवकरच शिरपूर तालुक्याचे वरिष्ठ नेते अमरिशभाई पटेल यांचाही भाजपात प्रवेश होईल आणि संपूर्ण शिरपूर तालुका हा भाजपमय होणार आहे असे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत झालेल्या भाजपच्या मेगाभरती कार्यक्रमावेळी संकेत दिले.
Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ३० सप्टेंबर, २०१९
शिरपूर काँग्रेसचे आमदार व तालुकाध्यक्ष यांचा मुंबई येथे झाला भाजपा प्रवेश
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा