Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, ३० सप्टेंबर, २०१९

ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे काळाच्या पडद्याआड




शोले’ चित्रपटात कालियाची भूमिका अजरामर करणारे ज्येष्ठ कलाकार विजू खोटे यांचे वृद्धपकाळाने निधन झाले.

ते ७८ वर्षांचे होते. गावदेवी येथील राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून ते आजारी असल्याने त्यांना काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

विजू खोटे यांनी त्यांच्या अनोख्या अभिनयाने हिंदी मराठी रंगभूमीवर राज्य केले.

खोटे यांनी तीनशेहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. मराठीतील ‘या मालक’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘आयत्या बिळावर नागोबा’ या चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष गाजली. प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या शोले चित्रपटातील कालिया या भूमिकेने त्यांना प्रसिद्धीझोतात आणले होते.

मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडणारे विजू खोटे यांच्या निधनाने नाशिकच्या सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध