Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ४ सप्टेंबर, २०१९
Home
/
Unlabelled
/
घरपट्टी वाढ तत्काळ मागे घेण्यासाठी त्वरित योग्य ती कायदेशीर पावले उचलली जाणार असल्याचे जन आंदोलन संघर्ष समितीस सत्ताधाऱ्यांचे आश्वासन
घरपट्टी वाढ तत्काळ मागे घेण्यासाठी त्वरित योग्य ती कायदेशीर पावले उचलली जाणार असल्याचे जन आंदोलन संघर्ष समितीस सत्ताधाऱ्यांचे आश्वासन
चोपडा(प्रतिनिधी)विनोद निकम येथील नगरपरिषदेच्या पदाधिकार्यांनी आज तातडीने जन आंदोलन संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांशी भेट घेत घरपट्टी वाढ मागे घेण्याविषयी आपण अनुकूल असल्याचे सुतोवाच करत तत्काळ कायदेशीर पावले उचलली जाणार असल्याचे विषद केले. शहरातील नागरिकांचा जनक्षोभ आणि दुष्काळी परिस्थिती पाहता मुख्याधिकारी यांच्या भूमिकेच्या उलट घरपट्टी वाढ रद्द करण्याविषयी न.प.सत्ताधारींनी आपली भूमिका जाहीर केली. व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष अमृतराज सचदेव यांच्या
कार्यालयात झालेल्या सदरच्या बैठकीत गटनेते जीवन चौधरी, राजु देशमुख, रमेश शिंदे यांनी प्रत्यक्ष चर्चेत भाग घेत हे आश्वासन दिले. मुख्याधिकार्यांनी जन आंदोलन संघर्ष समिती च्या निवेदनावर दिलेल्या परस्पर उत्तराबाबत सत्ताधारींनी स्पष्ट पणे अनभिज्ञता व्यक्त केली. समितीच्या वतीने चर्चेत अनिल वानखेडे, दिलीप नेवे, अजय पालीवाल, सुशिल टाटिया, यशवंत चौधरी, पुंडलिक महाजन,प्रफुल्ल स्वामी, सचिन जैस्वाल, प्रविण लोहार आदिंनी चर्चेत भाग घेतला. जनहिताच्या या संघर्षास समर्थन देणारे नगरसेवक डॉ रवींद्र पाटील, शिवसेना नगरसेविका संध्या महाजन यांचे पती नरेश महाजन हे देखील याप्रसंगी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा